पान:संतवचनामृत.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना - (क. ९.). मी त्यास क्षेम देऊ गेलो तसा तो माझ्या अंगांतच' जंडून गेला याची आशा केली असता हा पळून जातो, पण निराश बनल्यास तो. तत्काळ पावतो, असा याचा चमत्कार आहे (क. १२.) याच्या स्वरूपाचा निर्धार करणे अशक्य आहे. जसा मलयानिल पदरांतून गाळता येत नाही. अगर फुलांच्या वासाचा हार गुंफिता येत नाहीं, अगर मोत्यांचे पाणी रांजणांत भरतां येत नाही, तसे याचे वर्णनहीं करतां येणे अशक्य आहे (क. ९३). मी देह बळी दिल्यानेच याची मला प्राप्ति झाली; या निराकारास चंदन ज्याप्रमाणे भरावा, अगर अश्वत्थ ज्याप्रमाणे फुलावा, त्याप्रमाणे मी पाहिले. आता प्रपंच पाहणे पुरे; स्वरूपाच्या आनंदांत राहणे हेच श्रेष्ठ होय, अशी माझी खात्री पटली ( क. १४). आंत विठ्ठल, बाहेर विठ्ठल, मीच विठ्ठल, असे मला आता वाटू लागले (क्र. ९६), ध्याता व ध्येय यांमधील भेद नाहीसा झाल्याने देवा, तूं व मी आतां एकच घोंगडें पांघरूं, असें मी म्हणू लागलों (क्र. ९६ ). मी माझे गुरु जे श्रीनिवृत्ति तद्रूपच बनलों (क. ९७). रखुमादेवीवरास मी चक्षूविण' पाहिले, व हातावांचन स्पर्श केला ( क्र. ९९ ). जे दिसते पण हाती धरवत नाही, : त्याची खूण संतांस पुसावी, असे ज्ञानेश्वर म्हणतात (क्र. १०० ). रखुमादेवीवरास मी देहावांचन आलिंगन दिलें (क. १०१.). त्याने मला भेट दिली, तरी तो मजशी संभाषण करीना, म्हणून माझा जीव लांचावून गेला (क्र. १०२)... ज्याच्या निढळावर कोटिचंद्र प्रकाशमान होतात, जो कमळनयन आपले हास्य- .. वदन दाखवीत आहे, तोच आतां हालूं व डोलूं लागला; उभा राहून हातार्ने खुणावू लागला, व घडोघडी गुजगोष्टी सांगू लागला (क्र. १०३). ज्या नरास : आत्मज्ञानाच्या गोष्टी माहीत नाहीत त्यास या स्थितीचे वर्म कळणार नाही (क्र. १०४); म्हणून या गोष्टींचा मुखांपुढे उलगडा करूं नये असें ज्ञानेश्वर म्हणतात (क्र. १०५). ९, ज्ञानेश्वरांच्या अभंगचर्चेनंतर आपण सोपान, मुक्ताबाई व चांगदेव यांच्या अभंगचर्चेकडे वळू. जो सर्वदा रामकृष्णध्यान करितो. त्यास नानायोनिरूप आपदा भोगाव्या लागत नाहीत, असें सोनापदेव सांगतात (क्र. १). या जगांत सर्व काही सोवळे आहे, फक्त अभक्तांचे मन मात्र ‘ओवळे आहे; सोपानदेवाचे मोठे प्रचंड सोवळे असून, ते हरीविण वितंड बोलतच - . माहीत असे ते म्हणतात : (क्र. २). देवांमध्ये लीन होऊन आपण सुखदुःख :