पान:संतवचनामृत.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ संतवचनामृतः नामदेव. [६ १३२ १३२. पांडुरंग आपली पदवी सेवकास देतो. आपली पदवी सेवकासी द्यावी। तो एक गोलावी पांडुरंग ॥ भावाचा आलुका भुलला भक्तिसुखा । सांपडला फुका नामासाठी प्रेमाचा जिव्हाळा नामाची आवडी ।क्षण एक न सोडी संग त्याचा॥ नामा म्हणे आम्हां दीनाचे माहेर । तो एक उदार पांडुरंग ॥ १३३. जे भक्त संसाराची सोय सोडतात त्यासच देव मागे पुढे सांभाळितो. संसाराची सोयें चुकले बापुडे । केशव मागे पुढे सांभाळीत ॥ आळीकार नामे खेळे महाद्वारीं । आंतून बाहेरौं न वचे कांहीं ॥ संतांते देखोनि मिठी घाली चरणीं । कुरवंडी करूनि देह टाकी॥ ऐसे निजबोधे राहिले निवांत । नामा राहे एक केशवचरणीं ॥ १३४. नानाप्रकारच्या खेळियांचे वर्णन. नव्हे तेचि कैसे झालेरे खेळिया । नाहीं तेचि दिसू लागलेरे । अरूप होते ते रूपासि आले । जीव शीव नाम पावले रे ॥ आपलिच आवडी धरून खेळिया। आपआपणातें व्याले रे।' जोपनाकारणे केली बायको । तिणे एवढे वाढविले रे॥ ऐक खेळिया तुज सांगितले ऐसें । जाणुनि खेळ खेळेरे ॥धु०॥ ब्राह्मणाचे पोर एक खेळासि भ्याले । ते बारा वर्षे लपालेरे। कांपत कांपत बाहेर आले । ते नागवेचि पळून गेलेरे ॥ सहातोड्या एक संभूचे बाळ त्याने । बहूतचि बळ आथियेलें रे। खेळ खेळतां दगदगी व्याले। ते कपाट फोडुनी गेले रे॥ १ भुकेला. २ मार्ग, सबंध. ३ हट्ट घेणारे.