पान:संतवचनामृत.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१३१] संतमहिमा. १२३ आणिकापुढे न गाय हे ब्रीद साजे कोकिळिये । वसंत ऋतु स्वये ओळखीतसे ॥ आणिकापुढे न नाचे हे ब्रीद साजे मयूरा। वर्षला घन सारा वळोनियां ॥ एका लक्ष्मीपतिवांचूनि न बैसे आणि कापुढे। है ब्रीद साजे रोकडे गरुडासी ॥ आणिकांचा पांगिलो न करी गा देवा । नामा म्हणे केशवा रंक तुझा ॥ १३१. येथे एका पुंडलीकानेंच राज्य केले आहे. जन्मजन्मांतरी असेल सामुग्री । तरिच नाम जिव्हाग्री येईल वाचे॥ कर जोडुनी दोन्ही मोक्ष पाहे वास। म्हणे होइन दास हरिदासांचा॥ तरि हे तुच्छ करूनि न पाहती दृष्टी। आपगिले शेवटी ब्रह्मज्ञानी। नामाचेनि बळे उडविली साधने । तोडिली बंधने संसाराची॥ मुक्तिपद कोणी न घेती फुकासाठीं । हिंडे वाळुवंटी दीनरूपे । योगियाचे घर रिघे काकुलती । अव्हेरिल संती म्हणोनियां ॥ रिद्धिसिद्धि म्हणती आमुची कवण गती । यावे काकुलती कवणा - आम्हीं॥ मोक्षमुक्ति जिहीं हाणितल्या लाथीं। ते काय धरिती आमुची सोय ॥ ऐसे सर्व देवांसी श्रीदेव ते पूज्य । केलें एक राज्य पुंडलीके ॥ हर्षे निर्भर नामा नाचे महाद्वारीं । मुखीं निरंतरी नामघोष ॥ १ मेघ. २ अंकित. ३ स्वीकारिलें. .