पान:संतवचनामृत.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत. समर्पण करून त्या ज्योतिलिंगाचे आपल्या हृदयांत मी ध्यान केलें असें ज्ञानेश्वर - सांगतात (क्र. ६६ ). त्याचे तेज चंद्रसूर्यापेक्षाही जास्त होते. (क्र. ६९.) ने अणुप्रमाण असूनही जगाची उत्पत्ति त्यापासूनच होते असे माझ्या अनुभवास आले, असें ज्ञानेश्वर म्हणतात (क्र. ७१). रात्रीस सूर्याचा व दिवसास चंद्राचा उजेड असा विपरोत चमत्कार मी पाहिला. ज्यास उदय नाही व अस्त नाही, ‘असा आपल्यास आपण दर्पणच होऊन मी ठेलों. ही खूण अनुभवी लोकांसच कळणार. ही खूण सांगितली असतां संत संतुष्ट झाले असें ज्ञानेश्वर म्हणतात (क्र. ७२ ). नाद असो अगर ज्योति असो, दोहींच्या योगानं परिपूर्ण असा आत्मा माझ्या नजरेस आला (क्र. ७३ ). जो योगी अष्टांगसाधन करितो त्यास “याच मार्गाने आत्मप्राप्ति होते, असें ज्ञानेश्वर सांगतात (क्र. ७). ८. ज्ञानेश्वरांच्या अनुभवाची याच्याहीपुढे बहार आह. देवाचं रूप पाहिल्यावर ज्ञानेश्वरांस मौन पडलें, व पुढे बोलवेनासे झाले, असे ते म्हणतात (क्र. . .७६). देवांचा जो देव तो मी पहिला पाहिला, असें ज्ञानेश्वर द्विवार सांगतात. मी त्यांस अनंतरूपाने व अनंतवेषाने पाहिल्याने माझा संदेह फिटून गेला (क्र. ७७). • सबाह्य अभ्यंतर व्यापक अशा देवास निश्चयपूर्वक पाहिल्याने आज दिवस - सोनियाचा झाला आहे, व जणू कांहीं अमृताचा वर्षावच होत आहे असे वाटते. ... (क्र. ७८). मुक्यास जसा आपला आनंद व्यक्त करता येत नाही, तशी माझी . स्थिति झाली आहे (क्र. ७९). माझेच रूप सर्वत्र दिसत असल्याने मी आनंदांत मुरून गेलो आहे ( क्र. ८० ). हा आनंद माझ्या आंत न मावतां लोकांच्या नजरेस दिसू लागला आहे ( क्र. ८१). कापराची वात उजळून ती जशी आप ल्यामध्येच लनि व्हावी, तसा मी माझ्या आनंदांतच मुरून गेलो आहे (क्र. ८२). . अंगणांत कोण बोलले म्हणून पाहूं गेलो असतां मी पंढरिरायास पाहिले; व त्यामुळे जागृति, स्वप्न, सुषुप्ति, व तुर्या या अवस्थांमधील भेद नाहीसा झाला (क्र. ८r). • जारी व पुरुष दोघे एकाच रूपाने दिसतात, असें मी नवल पाहिल्याने शिव तोच शक्ति, व शक्ति तोच शिव, अशी माझी खात्री पटली (क्र.८६ ). ते रूप पहात असतां माझे पात्यास पातें सुद्धा लागण्याचे राहिले (क ८८) व त्या रूपाकडे पाहता ' पाहता मी तन्मय होऊन गेलों ( क्र. ८९). मी हे देखणे पाहिल्यावर प्रथम माझी दृष्टि गेली; मी बाह्या उचलून त्यास क्षेम द्यावयास गेलों, आनंदानें “अगा, गुरु-नाथ, देवराया " असें म्हणून मी स्फुदल्याने माझ्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहिल्या . 4 .