पान:संतवचनामृत.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : नामदेव. [६१०५ १०५. एकावांचून एक कोणत्या गोष्टी शोभा पावत नाहीत ? त्यागेणि विरक्ति प्रेमावांचूनि भक्ति । शांति नसतां शप्ति शोभा न पवे ॥ दमनेवांचूनि यति मानाविण भूपति। योगी नसत युक्ति शोभा न पवे॥ बहिर्मुख लावी मति नेमावांचूनि वृत्ति । बोधेविण महंती शोभा न पवे ॥ अनधिकारी व्युत्पत्ति गुरु तो कनिष्ठ याती। माता नीच शिश्नवृत्ति शोभा न पवे । हेतूवांचूनि प्रीति गुणरहित स्तुति । करणीवांचूनि कीर्ति शोभा न पवे ॥ सत्समागमसंगति बाणली नसतां चित्तीं। नामा म्हणे क्षितीं शोभा न पवे सर्वथा ॥ १०६. दुर्लभ द्वंद्वे. सुवर्ण आणि परिमळ । हिरा आणि कोमळ। योगी आणि निर्मळ । हे दुर्लभ जी दातारा ।। देव जरी बोलता । जरी कल्पतरू चालता। गज जरी दुभता। हे दुर्लभ जी दातारा॥ धनवंत आणि दयाल । व्याघ्न आणि कृपाल। अग्नि आणि सीतलु । हे दुर्लभ जी दातार ॥ सुंदर आणि पतिव्रता । सावधान होय श्रोता। पुराणिक आणि ज्ञाता। है दुर्लभ जी दातारा ॥ क्षत्रिय आणि शूर भला । चंदन फुली फुलला। स्वरूपी गुणव्यापिला। हे दुर्लभ जी दातारा॥ १ज्ञान. २ सुरूप. ३ गुणयुक्त.