पान:संतवचनामृत.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१०८] - संतमहिमा. ११५ ऐसा संपूर्ण सर्वगुणीं। केविपाविजे शारंगपाणी। विष्णुदास नामा करी विनवणी। मुक्ति चरणी त्याचिया॥ ___१०७. देवास मागणे. तुझे नित्य सुख ध्यावे येणे मने । असावै संधाने चरणाचेनि ॥ वासनेविरहित होऊनि एकवट । असावे निकट संतसंगे। ऐशी मज कृपा करी गा विठ्ठला । म्हणविसी आपुला दास जरी॥ श्रवणीं तुझे नाम ऐकावे आवडी। चित्तें देउनि बुडी प्रेमडोहीं॥ नयनीं तुझे रूप देखावे सर्वत्र । व्हावे भूतमात्र सखे माझे ॥ वदनीं तुझे नाम गावे निर्विकल्प। धरोनि तुझे रूप हृदयकमळीं। काया संतांपायी जावी लोटांगणी । ते भाग्य अनुदिनी देई बापा। हेचि माझे व्रत हेचि तपतीर्थ । करावे दास्यत्व संतांचे हैं। अनुदिनी व्हावा संतांचा हा संग । असावा अनुराग कीर्तनाचा॥ मानाचा मज ओस अपमानी उल्हास । देई तुझा ध्यास सर्वकाळ ॥ ५, संतमहिमा. १०८. साधूंची लक्षणे. सर्वांभूती पाहे एक वासुदेव । पुसोनियां ठाव अहंतेचा ॥ तोचि संत साधु ओळखावा निका । येर ते आइका मायाबद्ध ॥ देखिलिया धन मृत्तिकेसमान । नवविधारत्न जैसे धोंडे ॥ १ उदासपणा. २ नाहीसा करणे.