पान:संतवचनामृत.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१०४] . उपदेश.. ११३ १०२. विषयसंगाने इंद्राअंगीं सहस्रभगे पडली आहेत. संग खोटा परनारीचा । नाश होईल या देहाचा ॥ रावण प्राणासी मुकला। भस्मासुर भस्म झाला॥ गुरुपत्नीशी रतला। क्षयरोग त्या चंद्राला ॥ इंद्राअंगी सहस्रभगे। नामा म्हणे विषयासंगें ॥ १०३. जोपर्यंत कामिनीकटाक्षबाण लागले नाहीत तोपर्यंतच वैराग्याच्या गोष्टी! तोवरि रे. तावरि वैराग्याचे ठाण । जंव कामिनीकटाक्षबाण लागले नाहीं॥ तोवरिरे तोवरि आत्मज्ञानबोध । जोवरि अंतरि कामक्रोध उठले नाहीं॥ तोवरि रे तोवरि निरभिमान । जंव देहा अपमान झाला नाहीं॥ नामा म्हणे अवघी बचबच गाळी। विरळा तो जाळी द्वैतबुद्धी ।। १०४. संकल्पस्वरूपे वासने, तूं मला सोडणार नाहीस . तर केशिराज मला सोडवितील. परियसि वासने संकल्पस्वरूपे । विश्व त्वां आटोपे वश केले॥ ब्रह्मादिक तुझे इच्छेचे खेळणे । विषयाकारणे लोलिंगत ॥ परि माझ्या मना सांडी वो समर्थे । देई मज दीनाते कृपादान ॥ वेदशास्त्रवक्ते व्युत्पन्न थोरले । तृणापरिस केले हळुवट॥ कृपणाचे द्वारी होऊनि याचक । विसरले सकळिक आत्महित ॥ एकांते लाविला पुत्रकलबधंदा । नेणती ते कदां सुखगोष्टी ।। जन्ममरणाचे जंपियेले पाती। आकल्प भोगिती नाना योनी ॥ ऐसे तुझे संगे बहु झाले हिंपुटी । म्हणोनि पाडिली तुटी संतसंगा नामा म्हणे पुढती गांजिसील मज । येईल केशिराज सोडवणे ॥ १ स्थिति. २ आसक्त. ३ विद्वान्, ४ हलकट, ५ पंगत. ६ खिन्न, सं...८