पान:संतवचनामृत.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ संतवचनामृतः नामदेव. [६१८ ऐशा प्रकारच्या भक्ती। असती त्या नेणों किती। एक ओळगा लक्ष्मीपती । म्हणे विष्णुदास नामा ॥ __९९. वेश्या पाटाची राणी झाली तरी तिला मागील करणी आठवतेच. डोई बोडून केली खोडी । काया वागविली बापुडी॥ ऐसा नव्हे तो संन्यास । विषय देखोनि उदास ॥ मांजराचे गेले डोळे । उंदीर देखोनि तळमळे॥ वेश्या झाली पाटाचीरोणी। तिला आठवे मागील करणी॥ नामा म्हणे वेष पालटे । परि अंतरीचे ओसपण न तुटे॥ १००. लावण्याने सुंदर व रूपाने बरवी असलेल्या पापिणीचे तोंड पाहूं नये. लावण्य सुंदर रूपाने बरवी । पापीण जाणावी ते कामिनी ॥ देखतां होतसे संगाची वासना । भक्ताच्या भजना नाश होये ॥ ऐसी जे घातकी जन्म कासयाची । चांडाळीण तिसीनरक प्राप्त। नामा म्हणे तिचे पाहूं नये तोंड । पापीण ते रांड बुडवी नरा॥ ___१०१. जिचे रूप अतिहीनवर अशा परोपकारी माउलचेि चरण वंदावे कायारूप जिचे हिनवटै अती। माउली धन्य ती आहे नारी॥ तियेवरी मन कदापि नव जाये। भजना न होये कदा चळ ॥ ऐसिये माउली परउपकारी। घात हा न करी भजनाचा॥ नामा म्हणे तिचे चरण वंदावे । वदन पहावे माउलीचें ॥ १ पदाभिषिक्त राणी. २ हीन. A