पान:संतवचनामृत.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६९८] उपदेश... मन है दर्पणं करोनि निर्मळ । पाहे पां केवळ आत्मा स्वये ॥ तुझा तूं केवळ तुजमाजी पाहीं। नामा म्हणे ध्यायी केशिराजु ॥ ९७. जोपर्यंत विषयावर मन विटले नाही तोपर्यंत नित्यसुख कसें सांपडणार ? देहाचे ममत्व नाहीं जो तुटले । विषयों विटले मन नाहीं॥ तंव नित्य सुख कैसेनि आतुडे । नेणती बापुडे प्रेमसुख ॥ मीच एक भक्त मीच एक मुक्त । म्हणवी पतित दुराचारी ॥ नामा म्हणे तुझे कृपेंविण देवा । केवि जोडे ठेवा विश्रांतीचा ॥ २८. मांजराने उपवास केला तरी त्यास पारण्यास उंदौर पाहिजे. मांजरे केली एकादशी। इळवर होते उपवासी । यत्न करितां पारण्यासी । धांऊनि गिवसी उंदिरू॥ लांडगा बैसला ध्यानस्थ । तोवरि असे निवांत । जंव पेट सुटे जीवांत । मग घात करी वत्साचा ॥ श्वान गेले मलकार्जुना । देह कर्वती घातले जाणा । 'आले मनुष्यदेहपणा । परी खोडी न संडी आपुली । श्वाने देखिला स्वयंपाक । जोवरि जागे होते लोक! मग निजलिया निःशंक । चारौं मडकी फोडिली॥ वेश्या झाली पतिव्रता। तिचा भाव असे दुश्चिता! तिसी नाही आणिक चिंता । परद्वारावांचुनी ॥ दात्याने केली समाराधना। बहुत लोक जेविले जाणा। परि न संडी वोखटी वासना। खटनेट चाळितसे ॥ १ आरसा. २ सांपडणे.३ आतापर्यंत, इतका वेळ. ४ हुडकणे. ५ वाईट साईट.६ गाळणे. .