पान:संतवचनामृत.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. सर्व साधकांनी ध्यानात ठेवण्याजोगे आहेत. रक्त, शुभ्र, नील, पति, वर्ण समजून तुम्हीं मोन्याने रहा अमें ज्ञानेश्वरांचे म्हणणे आहे. (क. ४५). काळा, निळा, पारवा अखंड तमाशा डोळ्यापुढे दिसून (क. ४६ ), देवाचें बरवें कृष्णवर्ण अमोलिक रूप मला दिसले. (क. १७); जणू काही मला काळा दादुला . पाचारीतच आहे असे वाढू लागले, असे ज्ञानेश्वर म्हणतात (क. १८ ). हा जो गगनांत नांदणारा कृष्णवर्ण पुरुष तोच आत्मरूपाने मी या दृष्टीनं पाहिला (क्र. ५०). जिकडे तिकडे नीलप्रभा फांकन तिने सर्व आकाश व्यापून टाकिलें (क्र. ५३). ही अनुभवाची खूण बोटाने दाखविता येण्याजोगी नाही; आपण गुरुपुत्र होऊन तिचा अनुभवच घ्यावयास पाहिजे; ज्या ठिकाणी स्वरूप चळणार नाही व ढळणार नाही, त्या ठिकाणीच ते पहावे; ज्याच्या सत्तेने सर्व विश्व चालते, . में मागे पुढे बरोबर नेहमी. असते, जे पायाखाली तुडविलेही जातें, जे दृष्टीपुढे सर्वदा दिसते, ते बोटाने दाखविता येणे शक्य नाही. ही खूण समजून तिच्या . यथार्थतेबद्दल गुरुपुत्रास जाऊन प्रश्न करा, असे ज्ञानेश्वर सांगतात (क. ५४).. पाहता पाहता पाहण्याचा भाव नष्ट झाल्याने मोन्यच धरावे लागते; म्हणून अनुभवी जो मनुष्य आहे त्याचं बोलणे खुंटते असे समजावे (क. ५५). जे बुडणार नाही, ज्याचे आकलन करता येणे शक्य नाही, जे चोराचे हाती लागणार नाही, असें अमोलिक रत्न तुझ्या हाती सापडले आहे ( क्र. ५६ ). सतेज व उत्तम. आकाराचे, ज्याच्या अष्टही अंगांतून ज्योतीचा प्रकाश बाहेर पडत आहे, अशा. मोत्याचा लाभ तूं करून घे ( क्र. ५७). ते कोटें बाजारांत सांपडणार नाही, अगर शहरांत सांपडणार नाही; फक्त लक्षरूप लक्षाच्या मालाने मात्र ते मिळेल (क्र. ५८). ज्याने शून्य शोधिलें नाही त्याचे जिणे केवळ गाढवाचे होय; शुभ्र, . श्वेत, ताम्र, नील वर्णीचे शून्य पहावें (क. ५९). या शून्याचा शेवट ता डोळ्यानेच आपला डोळा पहावा ( क्र. ६२ ). ज्ञानेश्वरांस निवृत्तीनी हा नयन दाखविल्याने त्यांस हा नयनच सर्व ठिकाणी दिसू लागला (क्र. ६३). त्यांच्या शरीरांत ज्योतिलिंग उगवून त्यांनी हस्तावांचून त्यास कवळिलें (क्र. ६५ ). ज्याची स्वर्ग ही शाकुंका आहे, समुद्रवलय ही पिंडी आहे, शेषाप्रमाणे ज्याची बैठक आहे, जें तिहीं लोकांस आधारभूत आहे, ते लिंग मी देखिलें दोखलें असें ज्ञानेश्वर म्हणतात. मेघधारारूप धार त्याजवर धरिली, तारारुपी पुष्पांनी त्यास पूजिलें, चंद्रफळ त्यास अषण केलें, रविरूपी दिव्याने त्यास ओवाळिलें, व शेवटी आत्मनैवेद्य त्यात - -