पान:संतवचनामृत.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : नामदेव. [६९ ७९. माझ्या वाचेस, श्रवणास, अगर दृष्टीस तुझ्यावांचून दुसरा विषयच नाही. श्रीहरि श्रीहरि ऐसे वाचे म्हणेन । वाचा धरिसी तरी मी श्रवणी ऐकेन ॥ श्रवणी दाटसी तरी मी नयनी पाहनि । ध्यानी मी ध्याईन जेथे तेथे ॥ जेथे जाये तेथे लागला हा आम्हां। न संडी तुझे वर्म म्हणे नामा ॥ ८०. काळ देहास खाण्यास आला असतां आम्ही आनंदाने गाऊं नाचूं. काळ देहासी आला खाऊं। आम्ही आनंदे नाचूं गाऊं ॥ कोणे वेळे काय गाणे । हे तो भगवंता मी नेणे ॥ टाळ मृदंग दक्षिणेकडे । माझे गाणे पश्चिमेकडे ॥ नामा म्हणे बा केशवा । जन्मोजन्मी द्यावी सेवा ॥ ४. उपदेश. __८१. सर्वांगसाजिरी इंद्रिये आहेत तोपर्यंतच सावधान हो. सर्वांगसाजिरी आहेती इंद्रिये । तंव सावध होय हरिकथे। कीर्तन नर्तन वाचे जनार्दन । न पवसी पतन येरझारी॥ १ सुशोभित, टवटवीत. २ जन्ममरणाच्या खेपा.