पान:संतवचनामृत.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ६८४] उपदेश. १०५ पूर्ण मनोरथ घडती एका नाम । दाटेल सप्रेमें जीवनहेतु ॥ नामा म्हणे विलास न करीतूं आणिक। सर्वी सर्वो एक नाम असे।। ८२. संसारसागरांतून विवेकाने पोहणारा विरळा. संसारसागर भरला दुस्तर । विवेकी पोहणार विरळा संत ॥ कामाचिया लाटा अंगी आदळती। नेणों गेले किती पोहोनियां ॥ भ्रम हा भोवरा फिरवी गरगरा। एक पडिले घरा चोऱ्यांशीच्या॥ नावाड्या विठ्ठल भवसिंधु तारूं । भक्तां पैलपारू उतरितो॥ नामा म्हणे नाम स्मराश्रीरामाचें । भय कळिकाळाचं नाहीं तुम्हां। ८३. संसार करीत असतां परमार्थाचें वर्म सांपडणे शक्य नाही. संसार करितां देव जैं सांपडे। तरि क झाले वेडे सनकादिक ॥ संसारी असतां जरी देव भेटतांशुकदेव कासया जातांतयालागीं। घराश्रमी जरी जोडे परब्रह्म । तरि कां घराश्रम त्याग केला ॥ शातीच्या आचार सांपडे जरी सार तरिकां निरहंकार झाले साधु। नामा म्हणे आतां सकळ सांडोन। आलोसे शरण विठोबासी॥ ८४. अवळ क्षीर असतां गोचिडाप्रमाणे रुधिराचे सेवन कां करितोस ? परब्रह्मींची गोडी नेणती ती बापुडी। संसारसांकडी विषयभरित।। तूंते चुकली रे जगजीवनरक्षा।अनुभवावीण लक्षा नयेचिरे कोणा॥ जवळी असतांचि क्षीर नव्हेसी वरपडौ। रुधिर सेवितां गोचिडा जन्म गेला॥ दर्दुरी कमळिणी एके ठायीं बिढारं। वास तोमधुकर घेवोनि गेला॥ १ एकादाः २ गृहस्थाश्रम. ३ प्राप्त. ४ रक्त. ५ बेडूक, ६ वस्ति. ७ भ्रमर.