पान:संतवचनामृत.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८] नाम आणि भक्ति. ७६. माझ्या मनाने गोपाळ धरला आहे तो ते सोडीतच नाही. बेडूक म्हणजे चिखलाचा भोक्ता। क्षीर सांडूनि रक्ता गोचिड झोंबे॥ जयाची वासना तयासीच गोड । प्रमसुखचाड नाहीं तया ॥ वांझ म्हणे मी वाढविते जोझारे । उघडावया कैवाड नाहींकोणी॥ अस्वलाचे तेल माखियेलें कानीं । ते म्हणे रानी थोर सुख ॥ स्वामीचिया कानी खोविली लेखणी । ते घेत असे धणी घरोघर॥ गाढवासी लाविली तूप पोळी डाळ । के आळोआळ लाज नाहीं॥ सूकरी कस्तूरी चंदन लाविला । तो तेथोनि पळाला विष्ठाखाया ॥ नामा म्हणे माझे मन हे वोळले । धरिलासे गोपाळ सोडीचिना॥ ७७. अन्न उदक सोडून स्त्रीपुलांचा विसर पडून तुझें ध्यान लागो इतकेंच मला दे. हाती वीणा मुखी हरी। गाये राउळी भीतरीं ॥ अन उदक सोडिलें। ध्यान देवाचे लागले ॥ स्त्रीपुत्र बापमाय । यांचा आठव न होय ॥ देहभाव विसरला । छंद हरीचा लागला ॥ नामा म्हणे हेचि देई । तुझे पाय माझे डोई ॥ ७८.हाती वीणा घेऊन राउळांत उभ्याने कीर्तन करावें _ इतकेंच मला दे. विणा घेउनियां करीं । उभा राउळामाझारी॥ तहान भूक हारपली । छंद लागला विठ्ठलीं ॥ कन्या पुत्र बाप माय । त्यांचा आठव तो न ये॥ नामा म्हणे हेचि देई । तुझे पाय माझे डोई॥ १ भार. २ डुक्कर. ३ देउळांत.