पान:संतवचनामृत.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६७] नाम आणि भक्ति... नामापरता मंत्र नाहीं हो आणिक । सांगती ते मूर्ख ज्ञानहीन ॥ नामा म्हणे नाम केशव केवळ । जाणती प्रेमळ भक्त भले ॥ ६५. मी निर्विकल्पनाम गाइलें असतां तूं आपोआप मला हुडकीत येशील. नलगे तुझी मुक्ति नलगे तुझी भक्ति । मज आहे विश्रांति वेगळीच ॥ माझे मज कळले माझे मज कळलें ।माझे मज कळले प्रेमसुख ॥ न करीं तुझे ध्यान नलगे ब्रह्मज्ञान । माझी आहे खूण वेगळीच ॥ न करी तुझी स्तुति न वाखाणी कीर्ति। धरिलीसे ते युक्ति वेगळीच।। न करी कायाक्लेश इंद्रियां निरोध ! माझा आहे बोध वेगळाचि ॥ नामा म्हणे नाम गाईन निर्विकल्प । येसी आपोआप गिवसीत ॥ ६६. तूं लपलास तर तूं आपलें नाम कोठे नेतोस ? लपालासी तरी नाम कैसे नेसी । आम्ही अहर्निशीं नाम नाऊं ॥ आम्हांपासूनियां जातां नये तुज । ते हे वर्म बीज नाम घोकूँ॥ आम्हांसी तो तुझे नामचि पाहिजे । मग भेटी सहजें देणे लागे । भोळी भक्ते आम्ही चुकलो होतो वर्म। सांपडले नाम नामयासी॥ ६७. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढभाव ठेवावा. देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥ चरण न सोडी सर्वथा । तुझी आण पंढरीनाथा ॥ वदनीं तुझे मंगळ नाम । हृदयीं अखंडित प्रेम ॥ नामा म्हणे केशवराजा । केला नेम चालवी माझा ॥ १ कल्पना टाकून. २ शोधीत.