पान:संतवचनामृत.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ . संतवचनामृत : नामदेव. [६६१ ६१. हरिनामामृताने वाचेवर बसलेले असल्याचे मळ धुवून जातात. असत्याचे मळ बैसले ये वाचे। ते न फिटती साचे तीर्थोदके। हरिनामामृत प्रक्षाळी जिव्हेते। पाणिये बहुते काय करिती ॥ गंगासागरादि तीर्थ कोडिवरी। हरिनामाची सरी न पवती ॥ हरिनामगंगे सुस्नात पैं झाला । नाम्याजवळी आला केशिराज ॥ ६२. नामानें भक्ति जोडते, नामाने कीर्ति वाढते. नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे । नामापाशी असे भक्तिमुक्ति ।। नामा ऐसे सोपे नाहीं त्रिभुवनीं । नाम संजीवनी साधकांसी॥ नामें भक्ति जोडे नामे कीर्ति वाढे । नामें सदा चढे मोक्ष हातां ॥ यशदानतप नामें आली हातां । नामें सर्व सत्ता प्राप्त होय ॥ नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखीं । नाही याच्या तुकी दुजा कोणी॥ ६३. तुझे नाम म्हणजे केवळ अमृताची खाणीच होय. गोक्षीर लाविले आंधळिया मुखीं। तेथील पारखी जिव्हा जाणे ॥ तैसे देवा तुझे नाम निरंतर । जिव्हेसी पाझर अमृताचे ॥ सोलूनियां केळे साखर घोळिलें। अंधारी खादले तरी गोड । द्राक्षफळां घड सेवितां चोखड । तयाहूनि गोड नाम तुझे। आळूनियां क्षीर तुपाचिये आळे । कालविले गुळे गोड जैसे ॥ जाणोनियां नामा करी विनवणी । अमृताची खाणी नाम तुझे ॥ 1. ६४ नामांत व रूपांत भेद नाही. नाम तेचि रूप रूप तेंचि नाम । नामरूपा भिन्न नाहीं नाहीं ॥ आकारला देव नामरूपा आला । म्हणोनि स्थापिले नाम वेदीं ॥ १ जीवन देणारी. २ वजनांत, तुलनेस. ३ गाईचे दूध.. .