पान:संतवचनामृत.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : नामदेव. [६६८ ६८. तुझ्या नामाच्या अनुसंधानाने असतां प्रारब्ध भोगणें गोड वाटते. देवा माझे मन आणि तुझे चरण । एकत्र करोनि दिधली गांठी ॥ होणार ते हो गा सुखे पंढरिनाथा। कासया शिणतां वायांवीण ॥ माझिया अदृष्टी ऐसेंचि पैं आहे । सेवावे तुझे पाय जन्मोजन्मीं ॥ असतां निरंतर येणे अनुसंधाने । प्रारब्ध भोगणे गोड वाटे॥ . हृदयीं तुझे रूप वदनीं तुझे नाम । बुद्धि हे निष्काम धरिली देवा॥ नामा म्हणे तुझीं पाऊलें चिंतितां । झाली कृतकृत्यता जन्मोजन्मीं।। ६९. अखंड खंडेना असा जप कर, धरी रे मना तूं विश्वास या नामी । अखंड रामनामी ओळखी धरी।। जप करीं ऐसा अखंड खंडेना । निशिदिनी मना होय जागा ॥ नामा म्हणे मना होई रामरूप । अखंडित जप सोहं सोहं ॥ ७०. केशवाचे नाम घेशील तरच तूं वैष्णव होशील. वेदाध्ययन करिसी तरि वैदिकचि होसी। परि वैष्णव न होसी अरे जना ॥ गायन करिसी तरी गुणिजन होसी। परि वैष्णव न होसी अरे जना॥ पुराण सांगसी तरी पुराणिकचि होसी। परि वैष्णव न होसी अरे जना॥ कर्म आचरसी तरी कर्मठचि होसी। परि वैष्णव न होसी अरे जना॥. - १ प्रारब्ध.