पान:संतवचनामृत.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६.] नाम आणि भक्ति. समतेचे फणस गरे । आंबे पिकले पडिभरें। नामद्राक्षाचे घड । अपार रस आले गोड ॥ नामा म्हणे भावे ध्यावें । अभक्तांचे मढे जावे ॥ ५८. शेतास थोडे बाज नेऊन गाडाभर धान्य परत आणितात. शेती बजि नेतां थोडे । मोटे आणिताती गाडे ॥ एक्या नामें हरि जोडे। फिटे जन्माचे सांकडे ॥ बाळे भोळे जन । सर्व तरती कीर्तने ॥ नामा म्हणे नेणे मूढ । नाम स्मरावे सांबडें ॥ ५९. नामापुढे सर्वभक्षक अग्नीचे सामर्थ्य चालत नाही. अग्नि जाळी तरी न जळती पांडव । हृदयीं माधवधरिला म्हणोनि॥ अग्निजाळी तरी न जळती गोपाळाहृदयीं देवबोलधरिलाम्हणोनि॥ अग्नि जाळी तरी न जळे हनुमंत। हृदयीं सीताकांत ह्मणोनियां ॥ अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हाद । हृदयीं गोविंद म्हणोनियां ॥ अग्नि जाळी तरीन जळे पैं सीता । हृदयी रघुनाथ धरिले म्हणोनि ॥ लंकेसि उरले बिभीषणाचे घर हृदयीं सीतावरधरिलाम्हणोनि ॥ नामा म्हणे स्वामी स्मरावे गोविंदा । चुके भवबाधा संसाराची ॥ ६०. ज्या माउलीच्या ओठांवर विठ्ठलाचें नाम आहे तिचे पोटी देव जन्म घेतो. . विठ्ठलाचे नाम जे माउलीचे ओंठी । विठो तिचे पोटी गर्भवासी॥ जयाचिये कुळी पंढरीची वारी । विठो त्याचे घरी बाळलीला ॥ नामा म्हणे जिव्हे काढीन मी रवा । असत्य केशवा वचन होता। १ जोराने. २ भोळे. सं....७