पान:संतवचनामृत.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. . . . - संतवचनामृत. अशा विरहिणी स्त्रीच्या रूपकाने त्यांनी गरुंडवाहना, गंभीस, मला लोकरं भेट दे अशी ईश्वराची प्रार्थना चालविली आहे; रजनी दिवसाप्रमाणे होऊन मला रात्री डोळाही लागत नाही; मला अवस्था लाऊन गेला तो अजून का येत नाही, अशी देवाच्या भेटबिद्दल त्यांनी उत्कंठा दर्शविली आहे. क्रमांक ४० मध्ये याच विरहिणीचा विरह जाज्वल्यदशेप्रत जाऊन आपल्या भ्रताराची भेट होत नाही म्हणून तिला फार वेदना होत आहेत; चंद्र, अगर चांफा, अगर चंदन, यांच्या योगाने मनांतील दुःख वाढत मात्र आहे; चंदनाचे चोळीने माझें सर्वांग पोळन आहे; पुष्पांची शेज शीतळ म्हणतात, पण ती आगीप्रमाणे माझ्या अंगास पोळत आहे; कोकिळांनो, तुम्हीं मुस्वर गाता, पण त्याच्या योगाने माझ्या अंतःकरणांतील दुःख जास्तच वाढत आहे; दर्पणांत पहात असतां माझें रूप मला दिसत नाहीं अशी देवकीनंदनाने माझी स्थिति केली आहे, असें ज्ञानेश्वर म्हणतात. क्रमांक ४१ मध्ये “पुरे पुरे आतां जड झालें जिणे" असे ज्ञानेश्वर म्हणतात; जेथें तेर्थे तूंच पूर्वी दिसत असून आतां तूं लपून मजशी अबोला कां धरिलास असें ज्ञानेश्वर देवास विचारतात. नभ नभांत मिसळून कालिंदीजलास क्षोभ आल्याने तुझे रूप पहावयास सर्व जगाचे डोळे उत्सुक झाले आहेत; तूं आपल्या. कटीवर हात ठेवून भवजलाब्धीचा अंत इतकाच आहे असा पनांस संकेत दाखवीत आहेस; आमच्या हृदयांतील दिसणारी श्रीमूर्ति विठ्ठलवेषाचे आवरण घेऊन आझांस वाळवति मात्र आहे. तं कितीही वंचना केलीस तरी माझ्या चित्तांत पालट होणार नाहीं; बाप रखुमादेवविरा विठ्ठला, तूं मजशी अबोला कां धरिलास; तुझ्याशी संभाषण न झाल्याने माझ्या कुडीतून प्राण बाहेर निबूं पाहत आहे, असे ज्ञानेश्वर म्हणतात (क्र. ४२). ७. ज्ञानेश्वरांस साक्षात्कार झाला त्याचा मूळ पाया निवृत्तिनाथांनीच घातला असें ज्ञानेश्वरांचे म्हणणे आहे. ज्यावेळी निवृत्तिनाथांनी मला उपदेश दिला त्यावेळी तेथें एक वृक्ष होता, त्याच्या तळी योग्य रीतीने बसवून त्यांनी मला नामामृत पाजलें; अशा निवृत्तिनाथांच्या धर्माची भरभराट होवो असें ज्ञानेश्वर म्हणातात. त्यांनी मला परमार्थाचे रहस्य दाखविल्याबरोबर माझे अंधत्व नाहीसे झाले (क. 3 ). करतलावर' ज्यांप्रमाणे आंवळा. यावा त्याप्रमाणे परमार्थाचे सर्व वर्म निवृत्तिनाथांनी माझे हाती दिले ( क..r). ज्ञानेश्वरांनी आपल्या परमार्थमार्गातील जे जे अनुभव सांगितले आहेत से वे प