पान:संतवचनामृत.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६४९ संतवचनामृत : नामदेव. नामा म्हणे केशवा अनाथाचा नाथ। झणी माझा अंत पाहसी देवा ॥ ५०. एकतत्त्वनामावर तूं निर्धार धरिलास तर प्रपंच आपोआप ओसरेल. एकतत्त्व हरि निर्धार तूं धरीं । प्रपंच बोहरी एका नामें ॥ अच्युत गोविंद परमानंद छेद । नित्य तो आल्हाद हरिनामीं ॥ ऐसा तूं विनटे हरिनामपाठे । जाशील वैकुंठे नश्वरितां ॥ नामा म्हणे तत्त्व नाम गोविंदाचें । हेचि धरी साचे येर वृथा ॥ ५१. अनुभवानें, भावानें, अगर कपटाने कसेंही नाम वाचेस येऊ दे. “आगमी नाम निगमी नाम | पुराणी नाम केशवाचें ॥ अर्थी नाम पदी नाम । धृपदी नाम त्या केशवाचें ॥ अनुभवें भावें कपटे प्रपंचे । परि हरिचे नाम येऊं दे वाचे। नाम व्हावे नाम व्हावें । नाम व्हावे त्या केशवाचे । ऐसे नाम बहु सुंदर । नामीं तरले लहान थोर । नामा म्हणे अंतर । पडो नेदी याउपर ।। ५२. देहास क्लेश झाले असतांही वाचे हरिनाम उच्चारावें. देह जावो हेचि घडी। पाय हरीचे न सोडी ॥ क्लेश हो नानापरी । मुखी रामकृष्ण हरि। क्रीडा वैष्णवांचे मेळीं। हांक केशव आरोळी॥ नामा म्हणे विठोबासी । जे ते घडो या देहासी॥ १ नाश होणे. २ तल्लीन होणे. ३ देहावसान झाल्यावर. ४ शास्त्र. ५ वेद.