पान:संतवचनामृत.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. ४९ ] ९३ नाम आणि भक्ति. नाम आणि भाक्ति.. ३ नाम आणि भक्ति. . ४८. तुला कपटाचे कुपथ्य झाले असल्याने तूं नामाचे औषध घे. कपटाचे कुपथ्य झाले तुझे पोटीं । स्मरावा जगजेठी कृपाळु तो॥ नाम औषध घ्यावे नाम औषध घ्यावें। संतांचे लागावेसमागमीं ॥ त्यापासीं औषध आहे नानाविध । राम कृष्ण गोविंद म्हणतीवाचे॥ पुत्रस्नेहें कैसा अजामेळ स्मरला । तेणे तो उद्धरला क्षणमात्रे । राम राम म्हणतां तारिली कुंटिणी । वैकुंठभुवनी तिये वासु ॥ तेचि हे औषध प्रल्हाद घेतले । ते तूं घे उगले म्हणे नामा ॥ ४९, माझ्या मुखांत तुझ्या नामाचे खंडण झाल्यास माझी. रसना शतधा विदीर्ण होईल. . तुझ्या चरणाचे तुटतां अनुसंधान । जाईल माझा प्राण तत्क्षणीं ॥ मग हे ब्रह्मज्ञान कोणाते सांगसी। विचारी मानसी पांडुरंगा ॥ वदनीं तुझे नाम होतांचि खंडणा । शतखंड रसना होईल माझी ॥ सांवळे सुंदर रूप पाहतां तुझे दृष्टि । न देखतां उन्मळेती नयन हे ॥ तुज परतें साध्य आणीक नाहीं साधन । साधक माझे मन होईल भ्रांत ॥ १ शांत, मुकाट्याने. २ समूळ बाहेर यणे.