पान:संतवचनामृत.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५५] नाम आणि भक्ति. ९५. ५३. सर्व कर्माचे प्रारंभी नामच सांगितले आहे. नामाचा महिमा नेणेचि पैं ब्रह्मा । म्हणोनियां कर्मा अनुसरला ।। नाम हेचि कर्म नाम हेचि धर्म । केशव हेचि वर्म सांगितले ॥ . नाम शुद्ध स्नान नाम शुद्ध संध्या । नामाविणे वेद आणिक नाहीं॥ करितां आचमन केशव नारायण । करितां उच्चारण आधी हेचि॥ लग्नाचिये काळी म्हणती सावधान । लक्ष्मीनारायणचिंतन करा॥ देहाचिये अंती प्रायश्चित्त देती । शेवटीं वदविती रामनाम ॥ ऐसिया नामापरतें नाहीं सार । गिरिजेसी शंकर उपदेशी ॥ करिती पितृश्राद्ध कर्म आचरती । शेवटी म्हणती एको विष्णु ॥ नामें होय गति नामें होय मुक्ति । नामयाचे चित्ती रामनाम ॥ . ५४. सदा सर्वकाळ नाम कंठी धरल्यास गोपाळ सांभाळ करील. काळेवळ नसे नामसंकीर्तनीं। उंच नीच योनि हही नसे॥ धरा नाम कंठी सदा सर्वकाळ । मग तो गोपाळ सांभाळील ॥ कृपाळु कोवसा सुखाचा सागर । करील उद्धार भाविकांसी॥ नामा म्हणे फार सोपे हे साधन । वाचे नाम घेणे इतुकेंचि ॥ ५५. " अठरा पुराणांच्या पोटी, नामाविण नाही गोष्टी. " शिव हालाहले तापला । तोही नामें शीतळ झाला। नाम पावन पावन । याहूनि पवित्र आहे कोण ॥ १ जन्म. २ आश्रय, कैवारी. ३ विष. .