पान:संतवचनामृत.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ संतवचनामृत : नामदेव. [६४५ राहे राहे म्हणूनि उभा केलों । तेणें अंतरलो स्वामियां ॥ जंव क्षण एक उघडिले डोळे । पाहे तंव कंठ व्यापिला व्या। मायामोहसी डंखिले । त्यांचिये गैरळे झळंबलों ॥ जंव न पावेल शेवटील लहरी । तंव धांव उपाव करी ॥ विष्णुदास नामा धांवे पुकारी । माझा कैवारी केशिराज ॥ ४६. देवाने शिरावर हात ठेवून नामदेवास प्रेमसुख ___दिल्यावर नामदेव तृप्त झाला. घे रे घे रे नाम्या दिले माझे प्रेम । घोकी माझे नाम सर्वकाळ ।। शिरावरी हात ठेवितसे माझा । अभिमान तुझा गेला म्हणुनी ॥ भक्तिसुख देवें दिले नामयातें । नामा परमामृते तृप्त झाला ॥ नामा म्हणे देवा झालो मी पावन । माझे तुजविण कोण आहे ॥ ४७. खेचरदात्यामुळे सर्व सत्ता नामदेवाचे हाती येते. बोलूं ऐसे बोल । जेणे बोले विठ्ठल डोले ॥ प्रेम सर्वांगाचे ठायीं । वाचे विठ्ठल रखुमाई ॥ नाचूं कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावू जगीं ॥ परेहुनी परतें घर । तेथे राहूं निरंतर ॥ सर्वसत्ता आली हातां । नामयाचा खेचर दाता ।। १ दंश करणे. २ विष. ३ व्यापणे.