पान:संतवचनामृत.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

__६४५] नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. ९१ तुज नाहीं नाम रूप जाति कुळ । अनादीचे मूळ म्हणती तुज ॥ आम्ही भक्त तरी तूं भक्तवत्सल । ऐसा प्रगट बोल जगामाजी ॥ ऐसी आमुचेनि भोगिसी थोरवि ।। आमुचा जीवभाव तुझ्या पायीं ॥ नामा म्हणे केशवा जरी होसी जाणता। तरी या बोला उचिता प्रेम देई॥ ४४. राजाने जरी आपली कांता टाकिली तरी तिची जगावर सत्ता चालत नाही काय? .. प्रीति नाहीं राय वर्जियली कांता । परि तिची सत्ता जगावरी ॥ तैसे दंभधारी आम्ही तुझे भक्त । घालू यमदूत पायांतळी ॥ रायाचा तो पुत्र अपराधी देखा। तो काय आणिकां दंडवेल ॥. बहात्तर खोडी देवमण कंठीं। आम्हां जगजेठी नामा म्हणे ॥ ४५. विषयगरळाची शेवटची लहरी येण्याच्या अगोदरच .. - तूं मला वांचीव. मज चालतां आयुष्यपंथें । तारुण्यवन पातले तेथें ॥ मदमत्सरादि श्वापदै बहुतें । आली कळकळित मजपाशीं॥ ती धांवती पाठोपाठी । पाहे तंव विषयाचे घोटीं। काम क्रोध व्याघ्रांची वाटी। देखोनि पोटी रिघाले पाय ।। मग स्वधर्ममार्गी रिघालों। तंव अहंकारतस्करें आकळिलो ___ १ टाकणे. २ घोड्याच्या गळ्यावरील शुभदायक भोवरा. ३ हिंस्र पशु.. ४. खाखाकरित. ५ घाटांत. ६ जाळी. ७ चोर.