पान:संतवचनामृत.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६४२ संतवचनामृतः नामदेव.. लंकापति केला तुवां बिभीषण। झालासी उत्तीर्ण वाचाऋणे॥ उपमन्ये घेतला दुधाचाची छंद । तैसा बुद्धिमंद नव्हे जाण ॥ नामा म्हणे तैसा नव्हे मी अज्ञान । माग तुज देईन शरीर अवघे ॥ ४३. तुझा आम्ही अंगिकार केला आहे, व तूं आमच्यामुळे थोरवी भोगितोस, हे तूं विसरलास ! आम्हीं शरणागती केलासे सरता। येन्हवीं अनंता कोण जाणे ॥ वेदशास्त्रपुराणी उबंगोनि सांडिलासी। तो आम्हीं धरिलासे हृदयकमळीं ॥ चतुरां शिरोमणि अहो केशिराजा । आंगकार तुझा केला आम्हीं॥ सहस्रकनामे झालासी संपन्न । तरी हेही भूषण आमुचेनचि ॥ येन्हवीं त्या नामांची कोण जाणे सीमा। पाहे मेघश्यामा विचारोनि ॥ होतासी क्षीरसागरी अनाथाचे परी। लक्ष्मी तेथे करी चरणसेवा ॥ तेहि तंव जाण आमुची जननी । तूं तिये वांचोनि शोभसी कैसा ॥ १ कंटाळणे.