पान:संतवचनामृत.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४२] नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. अजगर कुंजर करितां विषपान । परि तुझे स्मरण न संडीच ॥ पतिपुत्र स्नेह सांडोनि गोपिका। रासक्रीडे देखा भुललीया ॥ एकीं तुझे ध्यान करितां त्यजिले प्राण । सांग ऐसे निर्वाण कवणे केलें ॥ . ऐसे मागां पुढां झाले असंख्यात । भक्तभागवत सखे माझे ॥ त्यांचेनि सरता झालासी त्रिभुवनीं । विचारी आपुल्या मनी पांडुरंगा ॥ आतां केले उच्चारण बोलतां लाजिरवाणे । हांसती पिसुणे संसारींची ॥ नामा म्हणे केशवा अहो शिरोमणि। निकुरा जासी झी मायबापा ॥ ४२. ध्रुवाप्रमाणे अज्ञान अगर उपमन्याप्रमाणे बुद्धिमंद __ मी नाही. आम्ही शरणागती सांडिली वासना। ते त्वां नारायणा अंगिकारिली ॥ म्हणोनि प्रसन्न व्हावया आमुते । वोरसल्या चित्ते चालविसी ॥ अज्ञान बाळकु ठकविला धुंरु । तैसा मी अधीरु नव्हे जाण ॥ १ हत्ती. २ पराकाष्ठेचा प्रयत्न. ३ मान्य. ४ चहाडखोर.५ कठोरपणा. ६ पान्हा सोडणे. ७ ध्रुव.