पान:संतवचनामृत.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६४० संतवचनामृत : नामदेव. सोडी ब्रीद देवा आतां नव्हेसी अभिमानी । पतितपावन नाम तुझे ठेवियले कोणी ॥ नामा म्हणे देवा तुझे नलगे मज कांहीं। प्रेम असो द्यावे कीर्तनाचे ठायीं ॥ ४१. भक्त उदार व देव कृपण असाच डंका पुराणांत गाजला आहे. आम्ही शरणागत परि सर्वस्वे उदार । भक्तीचे सागर सत्त्वशील ॥ कायावाचामने अर्थ संपत्ति धन। दिधले तुजलागून. पांडुरंगा ॥ आम्हांऐसे वित्त तुम्हां कैचें देवा । हा बंडिवार केशवा न बोलावा ॥ सत्त्वाचा सुभ? बंळि चक्रवर्ती। पहा पहा केवढी ख्याति केली तेणें ॥ त्रिभुवनींचे वैभव जोडिले ज्यालागुनि । ते शरीर तुझ्या चरणीं समर्पिल ॥ रावणा ऐसा बंधु सांडूनि सधैर। ओळंगती परिवार ब्रह्मादिक ॥ ते सांडोनि एकसरा आलासे धांवत । झाला शरणागत बिभीषण ॥ हिरण्यकश्यपे तुझा वैरसंबंध । पाहे पां प्रल्हाद गांजियेला ॥ १ प्रतिष्ठा. २ शूर, उत्तम योद्धा. ३. बळकट. ४ चाकरी करणे. ५ दास. ६ एकदम.