पान:संतवचनामृत.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४० ] नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. त्याचे सेवाऋण घेऊनि अपार । मग त्या देसी वर अनिर्वाच्य ॥ एकाची शरीरसंपत्ति आणि वित्त । 'एकाचे ते चित्त हिरोनि घेसी॥ मग तया देसी आपुले तूं पद । जंगदानी हे ब्रीद मिरविसी ॥ माझे सर्वस्व तूं घेई तुझे नको कांहीं। मनोरथाची नाहीं चाड मज ॥ नामा म्हणे केशवा जन्मजन्मांतरीं। करीन मी हरि सेवाऋण ॥ ३९. हात जोडून मढ्याशी बोलावें तशी माझी स्थिति झाली आहे. कागदींचे वित्त वेश्येसी दिधलें । तैसे आम्हां केले नारायणे॥ जोडोनियां हस्त बोले मढयापाशीं । तैसें तूं मजशी केले देवा ॥ कडू भोपळ्याचा कोणता उपयोग । तैसें पांडुरंगे केले जाण ॥ नामा म्हणे ऐसे करूं नको देवा । समागम व्हावा पायांसवे॥ ४०. "घेसी तेव्हां देसी ऐसा अससी उदार." घेसी तेव्हां देसी ऐसा अससी उदार । काय जाउनियां तुझे कृपणाचे द्वारां ॥ उच्छिष्टाची शिते न टाकिसी बाहेरी। कोणी दिधली देवा एवढी भूषणाची थोरी ॥ १ सर्व जगांत श्रेष्ठ दाता. २ लोभी, कवडीचुंबक.