पान:संतवचनामृत.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. संतवचनामृत: नामदेव. [ ३८ ३८. तुला निष्कामकर्मयोग माहीतच नाही. उदाराचा राणा म्हणविसी आपणां । सांग त्वां कवणा काय दिल्हे ॥ उचितां उचित देसी पंढारनाथा। न बोलों सर्वथा वम तुझी ॥ वमै तुझी काही बोलेन मी आतां । क्षमा पंढरिनाथा करी बापा ॥ न घेतां न देसी आपुलेही कोणा। प्रौढी नारायणा न बोलावी ॥ बाळमित्र सुदामा विपत्ती पीडिला । भेटावया आला तुजलागीं ॥ तीन मुंष्टि पोह्यासाठी मन केले हळुवंट। मग तया उत्कृष्ट राज्य दिले ॥ छळावया पांडवां दुर्वास पातला । द्रौपदीने केला धांवा तुझा ॥ येवढिया आकांती घेउनि भाजीपान । मग दिले अन्न ऋषींलागीं ॥ बिभीषणा दिधली सुवर्णाची नगरी। हे कीर्ति तुझी हरि वाखाणती ॥ वैरियाचे घर भेदें त्वां घेतले । कर त्याचे त्यासी दिधले नवल काय ॥ ध्रुव आणि प्रल्हाद अंबऋषि नारद । । हरिश्चंद्र रुक्मांगद आदिकरुनी ॥ १ उणेपण. २ मोठेपणा. ३ मुठी. ४ हलकें. ५ फितूरी काय॥ .