पान:संतवचनामृत.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.३७] नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. ८५ ३५. मी अंगुष्ठापासून मस्तकापर्यंत पातकें आचरीत आलो आहे. काय गुण दोष माझे विचारिसी। आहे मी तो राशी अपराधांची।। अंगुष्ठापासोनि मस्तकापर्यंत । अखंड दुश्चित आचरलौ ॥ स्वप्नी देवा तुझी नाहीं घडली भक्ति। पुसशी विरक्ति कोठोनियां। तूंचि माझा गुरु तूंचि तारी स्वामी । सकळअंतर्यामी गाऊं तुज ।। नामा म्हणे माझे चुकवीं जन्ममरण । नको करूं शीण पांडुरंगा ॥ ३६. मी कंटाळून आपोआप उठून जाईन असें तुला ___ वाटते काय? वारंवार काय विनवावे आतां । समजावें चित्ता आपुलिया ॥ तूं काय म्हणसी कंटाळेल हाचि । जाईल उगाचि उठोनियां ॥ मजलागीं देवा जासी चुकवोनि । आणीन धरुनी तुजलागीं ॥ दृढ भक्तिभाव प्रेमाचा हा दोरा । बांधीन सत्वर तुझे पायीं ॥ नामा म्हणे बोल काय विठो आतां । भेटावें सर्वथा यांत बरें॥ ३७. तुला जिवंत धरून सोहंशब्दानें मार दिल्यावर तूं काकुळतीस येशील. प्रेमफांसा घालुनियां गळां । जित धरिले गोपाळा ॥ एक्या मनाची करुनि जोडी । विठ्ठलपायीं घातली बेडी ।। हृदय करुनि बंदिखाना । विठ्ठल कोंडूनि ठेविला जाणा ॥ . सोहंशब्दं मार केला । विठ्ठल काकुळती आला ॥ नामा म्हणे विठ्ठलासी । जीवे न सोडी सायासीं ॥ १ पातक, २ जाळें. ३ जिवंत. ४ प्रयत्नानें.