पान:संतवचनामृत.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ संतवचनामृत : नामदेव. [६ ३२ ३२. संसारवणव्यांत जळत असलेल्या मजवर, करुणाधना, तूं आपल्या कृपेचा वर्षाव कर. तापत्रयअग्नीची जळतसे शेगडी। ओहाळोनि कोरडी झाली काया॥ केव्हां करुणाघना वोळसी अंबरी। निवविसी नरहरि कृपादृष्टी । शोकमोहाचिया झळंबलो ज्वाळीं । क्रोधाचे काजळी पोळतसे ॥ चिंतेचा वोणवा लागला चहूंकडां । जातो तळा बुडा धांव देवा॥ धांव धांव करुणाघना तुजविण । नामा म्हणे प्राण जातो माझा ॥ ३३. खुट्याभोवती फिरणाऱ्या वासराप्रमाणे मी आपआपणांस बांधून घेतले आहे. वासरूं भौवे खुंटिया भोवते । आपआपणियाते गोवियेले ॥ तैसी परी मज झाली गा देवा । गुंतला मी भावा लटिकिया। नामा म्हणे केशवा तोडी कां बंधने । मी एक पोसणे भक्त तुझा॥ ३४. मी लटिका असलो तरी तुझेच नाम गात आहे. लटिके तरी गायें तुझेचि नाम । लटिके तरी प्रेम तुझेचि आणी॥ सहजेंचि लटिके असे माझे ठायीं । तुझिया पालट नाहीं साचपणा॥ लटिकें तरी हरी करीं तुझे ध्यान । लटिके माझे मन तुजचि चिंती॥ लटिका तरी म्हणवी तुझात्रि मी दासापरिनामी विश्वास सत्य आहे लटिका तरी बैसे संतांचे संगतीं। परि आहे माझें चित्तीं ध्यान तुझे ॥ ऐसे लटिके माझे मन सफळ करी देवा। नामा म्हणे केशवाविनवित आहे॥ १ पोळणे. २ स्पर्शकरणे, पोळणे. ३ फिरणें. ४ पोसले जाणारे मूल.