पान:संतवचनामृत.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३१] ___ नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. ८३ ३. आंसवें दाटून बाह्या पसरून नामदेव विठ्ठलाची वाट पहात आहे. केधवां भेटसी माझिया जिवलगा । ये गा पांडुरंगा मायबापा ॥ आशा धरूनि पोटी दिवस लेखी बोटीं। प्राण ठेउनि कंठी वाट पाहे॥ चित्त निरंतर ठेउनि महाद्वारीं । अखंड पंढरी हृदयीं वसे ॥ श्रीमुख साजिर कुंडले गोमटीं । तेथे माझी दृष्टि बैसलीसे ॥ आंसवे दाटुनि पसरूनि बाहे । नामा वाट पाहे विठ्ठलाची ॥ . ३१. निलाजरा नामा कंठांत प्राण धरून रात्रंदिवस तुझे ध्यान करीत आहे. भेटीचे आर्त उत्कंठित चित्त। न राहे निवांत कवणे ठायीं ॥ जया देखे तया पुसे हेचि मात । के मज पंढरिनाथ बोलावलि ॥ माहेरीची आस दसरा दिवाळी । बाहे ठेवुनि निढंळी वाट पाहे ॥ कृपेचा सागर विठो लोभापरु । परि कां माझा विसरु झाला त्यासी ॥ विटेसहित चरण देईन आलिंगन। तेणे माझी तनु कोल्हावेलें । ऐसा निलाजिरी नामा कंठी धरोनि प्राण । करितो तुझे ध्यान रात्रंदिवस ॥ १ केव्हां. २ मोजणे. ३ शोभिवंत, सुंदर. ४ अश्रु. ५ हात. ६ उत्कट इच्छा. ७ कपाळ. ८ शांत होणे. ९ निर्लज्ज.