पान:संतवचनामृत.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२. संतवचनामृत : नामदेव. ६२८ सरितामाजी धरिलो मदनमगरौं । पुढारी मागारी होऊ नेदी ॥ न निघे न निधे आणिकां पोहणारे। सहित पितांबरे घाली उडी॥ थडीये उभया धांव गा श्रीहरी । हानी झाली थोरी सर्व गेले ॥ भक्तिनवरत्नाची बुडाली वाखोरी। काढी वेगी हरि कृपालुवा ॥ धीर आणि विचार ह्या दोन्ही सांगडीं। श्रद्धा पुढे दोरी तुटोनि गेली ॥ भावबळे सांपडलों दाटलो उभौं। वेगी घाली उडी कृपालुवा ॥ नामा म्हणे भजनेविण कोरडा गळा। नेतो रसातळां क्रोधमान ॥ २९. तुझ्या रूपाची वाट पाहतांना माझे लोचन शिणून गेले आहेत. काय पांडुरंगा सांग म्यां करावें । शरण कोणा जावें तुम्हांविण ॥ पाहतांना वाट भागले लोचन । कठीणच मन केले तुर्वा ॥ ऐकिली म्यां कानी कीर्ति तुझी देवा । उठलासे हेवा त्याचि गुणे॥ अनाथ अन्यायी काय मी करीन । दयावंता खूण सांगसी तूं ॥ नामा म्हणे आस पूर्ण कीजे देवा । रूपडे दाखवा नेटेपाटे ॥ - १ काठावर. २ माळ. ३ पूर. ४ मासा. ५ डोळे. ६ लवकर, सत्वर. .