पान:संतवचनामृत.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२८] नामदेवांच्या अंतःकरणातील तळमळ. ८१ २६. आतां आम्ही आमच्या गांवास जातो, तुम्ही आम्हांवर कृपा असों द्याबी. बहुत दिवस तुमचे गांवीं । आतां कृपा असो द्यावी ॥ आम्ही जातो आपुल्या गांवा । विठोबा लोभ असो द्यावा ॥ तुझे पायीं माझे मन । माझे ठायीं तुझा प्राण ॥ लिखित पत्र पाठवावें। माझे स्मरण असो द्यावे ॥ नामा म्हणे जी केशवा । अखंड प्रेमभाव द्यावा ॥ २७. मला नामाची सांगड देऊन वैकुंठावर नेऊन घाल. संसारसागरी पडलो महापुरीं । सोडवण करी देवराया ॥ नामाची सांगडी देऊनियां माते । वैकुंठावरुते नेउनी घाली ॥ कामक्रोधमगर करिती माझा ग्रास । झणीं तूं उदास होसी देवा॥ नामा म्हणे झणीं मोकलिसी माते । नाम तुझे सरते धरले एक ॥ २८, दुसऱ्या पोहणाऱ्यांकडून मी बाहेर निघत नसल्याने तूं पीतांबरासकट उडी घाल. माझे मनीं ऐसे होतसे गा देवा । देह समर्पावा तुझे पायीं॥ तंव या मायामोहे मजसी केला हेवा । लोटियेले देवा भवजळामाजीं ॥ आशानदीपुरीं वाहविले दुरी। काढी मज हरी कृपाळुवा ॥ १ भोपळ्याचा ताफा. २ सुसर. ३ कदाचित्. ४ वंद्य. ५ मत्सर, द्वेष. सं...६