पान:संतवचनामृत.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८. संतवचनामृत : नामदेव. [६२४ नवमास गर्भवासीं। कष्ट झाले त्या मातेसी। ते निष्ठुर झाली कैसी । अंती दूर राहिली॥ जीवीं बापासी आवड । मुखी घालोनि करी कोर्ड। जेव्हां लागली यमओढ । तेव्हां दूर टाकिले। बहिणीबंधूचा कळवळा । ते तूं जाणसी रे दयाळा । जेव्हां लागली यमशंखळा । तेव्हां दूर राहिली॥ कन्यापुत्रादिक बाळे । हीं तव स्नेहाची स्नेहाळे । तुझ्या दर्शनाहूनि व्याकुळे । अंती दूर राहिली ॥ देहगृहाची कामिनी । ते तंव राहिली भवनों। मी तंव जळतसे स्मशानी । आग्निसवे येकला ॥ मित्र आले गोत्रज आले । तेही स्मशानी परतले । शेवटी टाकूनियां गेले । मजलागी स्मशानी ॥ ऐसा जाणोनि निर्धार । मज मग आला गहिवर। तंव दाही दिशा अंध:कार । मज कांहीं न सुचे ॥ ऐसें जाणोनि निर्वाण पाहीं। मनुष्यजन्म मागुता नाही। नामा म्हणे तुझे पायीं । ठाव देई विठोबा ॥ २५. माझी कीव कर, नाही तर माझा जीव घे. तुझा माझा देवा कां रे वैराकार । दुःखाचे डोंगर दाखविसी ॥ बळे बांधोनियां देसी काळाहाती। ऐसे काय चित्ती आले तुझ्या॥ आम्ही देवा तुझी केली होती आशा । बरवे हृषीकेशा कळों आलें। नामा म्हणे देवा करा माझी कीव । नाहीं तरी जीव घ्यावा माझा॥ १ आवड. २ स्त्री. ३ शत्रुख,