पान:संतवचनामृत.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४] नामदेवांच्या अंतःकरणांतील तळमळ. ७९ भी अपत्य तूं जननी पांडुरंगा ॥ मीभक्ति तूं निजसोय मी ध्यान तूं ध्येय । मी आडळ तूं साह्य पांडुरंगा ॥ ऐसी जे जे माझी विनंति ते तुजचि लक्ष्मीपति। नित्य सुखसांगाती पांडुरंगा ॥ शीघ्र येई वो श्रीरंगे भक्तमानसरंगें। प्रेमपान्हा देगे नामदेवा ॥ २२. पक्षिणी चाऱ्यास गेली असतां उपवाशी पिलाप्रमाणे . माझी स्थिती झाली आहे. पक्षिणी प्रभाती चारियासी जाये । पिलू वाट पाहे उपवासी॥ तैसे माझे मन करी वो तुझी आस । चरण रात्रंदिवस चिंतीतलें। तान्हें वत्स घरी बांधलेसे देवा । तया हृदयीं धांवा माउलीचा ॥ नामा म्हणे केशवातूं माझा सोईरा । झणी मज अव्हेरा अनाथनाथा॥ २३. अग्नीमध्ये पडलेल्या बालकाच्या कळवळ्याने मातेप्रमाणे तूं धांव. अग्निमाजी पडे बाळु । माता धांवे कनवाळु॥ तैसा धांवे माझिया काजा । अंकिला मी दास तुझा ॥ सवेचि झेपावे पक्षिणी । पिली पडतांचि धरणीं। भुकेले वत्सरावें । धेनु हुबरत धांवे ॥ वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतीत हरणी॥ नामा म्हणे मेघ जैसा । विनवितो चातक तैसा॥ २४. मी स्मशानी जळत असतां मला सर्व टाकून सर्व पळून जातील, अंतकाळी मी परदेशी । ऐसें जाणोनि मानसीं।. . म्हणोनियां हृषीकेशी । शरण तुजसी मी आलो ॥ १ अडचण. २ कदाचित्. ३ कार्य. ४ वासरूं.. .....