पान:संतवचनामृत.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६ संतवचनामृत : चांगदेव. [६५ ५. जातो ममायं विशदः प्रकामं प्रत्यर्पितन्यास इवांतरात्मा. आत्मा हा नोवरा कुडी हे नोवरी। लिंबलोण करी वोहरांसी ॥ सोहळा जाला नोवरा गांवा गेला। वेगी आइती करा नोवरी बोलावा ॥ न्हाणिली धुणिली गजस्कंधी मिरविली । बोळवीत गेली चौघे जणे ॥ ज्याची नोवरी त्या हाती लाविली । चांगा म्हणे आतां निश्चित झाली ॥ ... ६. जळांतील सूर्याप्रमाणे देहांत परमात्म्याचा प्रकाश.. प्रकृतीचे पूजन प्रकृतीच्या ठायीं । असतां तोही परि चोजवेना । जळामाजी भानु बिंबला दिसे । तैसा देही दिसे परमात्मा ॥ पुष्पामाजी परिमळ राहिला निश्चळ। तैसा तो अकळ लक्षा नये॥ हे बोलणे सिद्धांतींचे शेवटीं। चांगया वेदांती कथन केले॥ ७. आकाशास मुंगीने गवसणी घातली. आकाश कवळिलें मुंगीने बाहीं । तेथे एक नवल वितले पाहीं ॥ नवल झाले नवल झाले । विश्व व्यापिले मुर्कुटाने ॥ वटेश्वरी चांगा सूक्ष्म स्थूळ । जाति ना कुळ बाईयांनों । ८. डोळ्यांवांचून स्वस्वरूपाचे देखणे. डोळे पैं दोंदीलं जाले माझे । आपुले सहजै रूप देखे ॥ सुखाची माउली भेटावया आली। स्तनपान जाली याचकासी॥ १ दांपत्य, जोडपें, २ समजणे. ३.उत्पन्न झाले. ४ धुंगुरटें. ५ दोंद निघालेले, निडारलेले.