पान:संतवचनामृत.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१.] अनुभव. माझे सुख सुखेंचि भोगावे । डोळ्या पाडावे डोळेवीण ॥ वटेश्वर चांगा शून्यीं बुडाला । डोळसु जाला परब्रम्हीं ॥ ९. स्वरूपदर्शनाने वृत्तीचे ताटस्थ्य. पाहूं गेले तंव मी माझी हारपलें। ठकचि ठेले काय सांगों॥ मन ब्रह्मीं वेडावले सोहंशब्दी हारपलें । इंद्रियासहित बुडालें काय सांगा ॥ पारुषली मति अतिज्ञान ज्योति । वटेश्वरी निवृत्ति चांगा म्हणे ॥ १०. बोल बोले पण डोळां न दिसे. यंत्राची युक्ति शब्द प्रकाशे । बोल बोले तव डोळां न दिसे ॥ रुणझुण रुणझुणा कनरी वाजे । येणेंचि आनंदें त्रिभुवन गाजे ॥ चांगा वटेश्वर नादी निमाला । ब्रह्म पाहतां ब्रह्मचि जाला ॥ १ नाहीशी होणे, २ पांवा.