पान:संतवचनामृत.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चांगदेव १. चांगदेवास मुक्ताईने पोसणा घेतलें. चांगा जन्मला मध्यान्हकाळी । मायबापे दोन्ही नाहीशी झाली ॥ मुळीच चांगा नाहीसा झाला। मुक्ताई म्हणे चांगया भलाभला ॥ वटेश्वर चांगा मुळी लागला । पोसणा घेतला मुक्ताईने । २. चांगदेव सत्रावीचे दूध पितो. सत्रावी दोहतां कांहींच नाहीं । दोहन ते पाहीं ब्रह्मस्थानी ॥ दोस्तनी पान्हाइली तिसरेनि दोहिली।दोहन ते उरली विश्वंभरा॥ बांगा वटेश्वर विश्वंभर जाला। प्रेमें तो लाधला क्षीर देखा ।। ३. चांगदेवाचे शांतीशी लग्न लागतांना मुक्ताई करवली हळद वाटते. वहाडी आले संसारनगरा। चांगा नोवरा केळवला ॥ हाती कांकण उभा वटेश्वरीं। शांति हे नोवरी पर्णावया॥ पर्णिली शांति बैसली पाटीं । मुक्ताई करवली हळदुली वाटी॥ ४. कुडी ही नोवरी, आत्मा हा नोवरा. कुडी हे नोवरी आत्मा हा नोवरा। दोघे पणे जाती निरंतरा॥ पांचही प्राण सर्वही व-हाडी। आशा तृष्णा दोन्ही देशधडी॥ शांति निवृत्ति दोघी सुवासिनी । भक्ति करवली सखी बहिणी॥ घटेश्वर चांगा वरधंवा । तुम्ही नेऊनि मध्ये बैसवा ॥ १ दत्तक, पासण्याकरितां घेतलेला. २ दूध काढणे, ३ पान्हा फुटणे, दूध देणे. ४ केळवण झालेला. ५ लग्न लावणे, वरणे. ६ लग्न लावणे. ७ वर, नवरा. सं...५