पान:संतवचनामृत.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतवचनामृत : मुक्ताबाई. [६९ ९. बोलणे झाल्यास अबोलण्याने बोल. वेदश्रुति ठक पडियेली वाचा । तेथे कवणपाड तुझिया बोलाचा॥ काही बोलसीतरी अबोलणे बोलाबोलणे बोलसीतरी तितुके खोल अनिर्वाच्य ब्रह्म न वर्णवे वाणी। बोलो म्हणती ते न लजती मनी॥ बोलणे अबोलणे वटेश्वरीं गुज। मुक्ताई म्हणे चांगया बुझे । १०. उन्मनीरुप निद्रेच वर्णन. गुणातीत डाहाळी पाळणा लाविला । तेथे सुत पहुडला मुक्ताईचा निजी निज बाळा न करी पें ऑळी । अनुहात टाळी वाजविते ॥ निद्रा ना जागृति भोगी पैं उन्मनीं । लक्ष ते भेदूनि निज पार्टी ॥ निभ्रांत आतां पाळणा विणवुनी । मन हे बोधनि पवनदोरा ॥ एकविससहस्र श्वास वेळोवेळां । बाळा तोही डोळा स्थिर करी॥... निद्रा ना जागृति निजसील काई । परियेसी चांगया बोले मुक्ताई। ११. अद्वैतानुभवांत निद्रा. आपुलिया मारूनि येई कां भेटी । मग गोल्हार्टी सांठवीन ।। शांति धाया मेळवीन तुज । मग तूं बूझ सोहंकारी ॥ सोहं सोहं सोहं हाचि धरी छंदु । मुखे निद्रा करीं अद्वैती रे॥ तेथे जाग पां जाग नीज पां नीज । मग तुज वो कैचा ॥ तेथे ओळखी नाही विसरु नाहीं। चिदानंदी पाहीं रूप तुझे। द्वैताद्वैत भासले पाहीं। वटेश्वरसुता बोले मुक्ताई ॥ १२. नोवरीच्या पोटास नावरा येतो. नोवरीचे पोटी नोवरा जन्मला । सोहळा जाला काय सांगों ॥ नोवऱ्याने नोवरी देखिलच नाहीं । सोहळा होतो सांगों काई॥ तो नोवरा नातुडे कोणा । मुक्ताई चांगया सांगतसे खुणा ॥ १ भूल. २ समज. ३ फांदी. ४ छंद. ५ ऐक. ६ दाई. ७ समज. ८ जागृति. ९ चांगदेव. १० स्वाधीन न होणे.