पान:संतवचनामृत.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ संतवचनामृत : ज्ञानदेव. [६१०५ १०५. हा बोध मूर्खास सांगू नये. ऐका हा शेवट अभंगमाळा झाली । तुर्या हेच आली प्रत्यया गा॥ तुर्या तेचि उन्मनी क्षर ते अक्षर । निर्गुण साकार ऐसे देखा ॥ देह ते विदेह महाकारण ब्रह्म । हे निश्चयाचे वर्म ऐसें जाणा ॥ कनक तेचि नगं समुद्र तरंगी । देह हा सर्वांगी ब्रह्म जाणा ॥ अभंगा शेवट जाणे निवृत्ति एक । त्याणे मज देख कृपा केली ॥ मूर्खासी हा बोध सांगों नये बापा। अभंगकृत्याचालेश नसो हाती॥ ज्ञानदेव ह्मणे हे कृत्य हातां नये । माय देऊं नये कोणासही ॥ १ अनुभव. २ दागिना.