पान:संतवचनामृत.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- संतवचनामृत. ५. आता आपप्प या पुस्तकांत घेतलेल्या ज्ञानेश्वरांच्या अभंगांच्या चर्चेकडे वळू. एकंदरीत ज्ञानेश्वरांचे अभंग इतके चांगले. आहेत, आणि त्यांतल्यात्यांत साक्षात्कारविषयक अभंग इतके उत्कृष्ट आहेत, की ते त्या बाबतीत ज्ञानेश्वरीसही थोडेबहुत मागे टाकतील असे म्हणण्यास हरकत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये जसे ज्ञानेश्वरांचे उच्च दर्जाचे तत्त्वज्ञान दिसते, त्याप्रमाणे त्यांच्या अभंगांमध्ये भाकरस व. स्वानुभव ही विशेषेकरून दिसतात.. प्रथमच ज्ञानेश्वरांनी सकळ मंगळनिधि श्रीविठ्ठलाचे नाम घ्या असे सर्वांस विनविलें आहे (क्र. १). इतर काहींच न जाणतां एक विठ्ठल जाणल्यास. पुरे; हीच भक्ति व हेच ज्ञान, असे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. (क्र. २). बहुत सुरुताची जोडी असेल तरच विठ्ठलावर आवड उत्पन्न होते, असे त्यांचे म्हणणे आहे (क्र. 3.). पुत्र, दारा, धन ही सर्व काळाचें साय असल्याने आपणांस शुकाप्रमाणे नळिकेस लटकावून घेऊन आपण बद्ध आहों अशी भावना करून घेऊ नये, राखुंडी फुकन ज्याप्रमाणे दीप लागत नाही, त्याप्रमाणे शब्दज्ञानाने आत्मप्रकाश होत नाहीं (क्र. ५). आमिषाकडे लक्ष ठेवून जसें बक ध्यान करतो, त्याप्रमाणे ध्यान करूं नकोस (क्र. ५). तुला पापांतून सुटका हवी असेल तर तूं गुरूस शरण जा ( क्र. ९). गुरुनाथाने मस्तकी हस्त ठेविल्यावांचन मनास समाधान प्राप्त होणार नाही (क्र. ११). गुरु हा एक संतकुळींचा राजाच आहे; गुरुस सुखाचा सागर अगर धैर्याचा डोंगर असेंही म्हणतां येईल (क्र. १२). सर्प बेडूक गिळीत असतां बेडकाने जसा मासा सावा त्याप्रमाणे तूं काळांच्या सपाट्यांत सांपडला असतांना विषयलोलुप होऊ नकोस (क्र. १३). ज्या नामानें ध्रुव, प्रल्हाद, अंबरीष तरले, तेच नाम सार आहे असे समज (क्र. १४). नाम घेण्यास अधिकार व अनाधिकार असे काही नसून केवळ त्याच्या उच्चारानेच मोक्ष मिळतो (क्र. १६). नाम ही श्रेष्ठांतील श्रेष्ठ वस्तु आहे ( क्र. १८ ). जन्मजन्मांतरीच्या पुण्याचा संचय असेल तरच रामाचे नांव वाचेस येईल (क्र. १९). नामाने क्षणार्धात पापराशि दग्ध होतील (क्र. २०). नाम उच्चारण्यास काळ वेळ वगैरे, पाहण्याचे कारण नाहीं (क्र. २४). एकतत्त्व नामाचे साधन केले असता केव्हाही द्वैताची बाधा होणार नाही, नामामृतगोडी लाधल्यास ती एक जीवनकळाच आहे असे म्हणण्यास हरकत नाही (क्र. २५). अर्धघटिकाही नामस्मरणावांचून राहू नको (क. २६.). एकतत्त्वनाम तूं हृदयांत दृढ धरशील तर हरीस तुझी खात्रीने करुणा येईल; ज्ञानेश्वराने मान्यरूप जपमाळ -