पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
संतति-नियमन

कारणासाठी प्रसवितेचें कांहीं तरी एक विशिष्ट प्रमाण निसर्गानें योजलेलें असतें. या प्रमाणाला आपण 'निसर्गप्रमाण' म्हणू. हें प्रमाण अबाधित असलें म्हणजे जन्म व मरण या दोन्ही गोष्टींचा योग्य मेळ बसलेला असतो, आणि ती प्राणिजाति सुव्यवस्थितपणें पृथ्वीवर नांदत असते, परंतु एखाद्या प्राणिजातीनें या प्रमाणांत ढवळाढवळ केली आणि उत्पादन कार्य वाजवीपेक्षां फाजील वेगाने सुरू केलें तर निसर्ग त्या बंडखोरीची उपेक्षा करीत नाहीं. त्या जातीचें मृत्यु- प्रमाणही निसर्ग ताबडतोब वाढवितो आणि चलित झालेलें मूळ प्रमाण त्या उपायानें पुन्हा प्रस्थापित करतो. मानवी जातही या निसर्ग नियमाच्या अंमलाखालींच आहे. त्यामुळे कोणत्याही देशांत जन्म- संख्येचे प्रमाण अतिशय वाढलें कीं ताबडतोब निसर्गाच्या योजने- नुसार मृत्युसंख्येचे प्रमाणही तितकेंच वाढते. हिंदुस्थानांतील जन्म- संख्येचेच नव्हे तर त्याबरोबरच मृत्युसंख्येचेंही प्रमाण जगांतील सर्व देशांपेक्षा अधिक आहे, आणि लोकसंख्येची वाढ होण्याच्या बाबतींत मात्र हिंदुस्थानाचा क्रम विसावा लागतो हें सर्व निसर्गनियमांस अनुसरूनच कसें आहे याविषयीं वाचकांची आतां खात्री पटली असेल. जन्मप्रमाण व मृत्युप्रमाण हीं बरोबरच वाढावीत आणि कमी • व्हावीत असा जर निसर्गाचा नियमच आहे व आपल्या देशांतील मृत्युसंख्येचें प्रमाण भयंकर वाढले असल्याचे स्पष्ट दिसत आहे, तर हैं प्रमाण कमी करण्याचा उपाय कोणता तें आतां आपल्याला समजूं नये काय? आपल्या देशांतील जन्मसंख्येचें मान कमी करणें हा एकच उपाय आपल्या देशाची सांप्रतची दुःस्थिति सुधारूं शकेल याविषयींची शंका बाळगण्याचे यापुढें कांहीं कारण आहे काय ? म्हणूनच आपल्या देशाच्या सांप्रतच्या परिस्थितीत विवाहित स्त्री- पुरुषांस बहुप्रसवतेऐवजी संततिनियमनाचाच उपदेश करण्याच्या इष्टतेविषयीं आतां सूज्ञ लोकांची एकवाक्यता व्हावयास लागली आहे.