पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संततिनियमनाचें अगत्य

२३

 बहुप्रसवितेमुळे मृत्युबाहुल्य आणि कुप्रजाजनन असे परिणाम निसर्गनियमानुसार घडवावयाचेच हें येथपर्यंत आम्ही स्पष्ट केलें.. या बाबतीत आणखीही एक गोष्ट विचारांत घेण्यासारखी आहे. ती ही, कीं एकंदर मानवजातीचा विचार करणाऱ्या पंडितांची अशी खात्री झालेली आहे, की सध्यां ज्या प्रमाणांत प्रजाजनन होऊन मानवजातीची संख्या वाढत आहे तें प्रमाण जर असेंच चालू राहिलें तर कालांतरानें पृथ्वीच्या पोटांतून जितकें धनधान्य निवर्णे शक्य आहे तितकें काढलें तरी तें देखील अपुरे पडून माणसांना अर्धपोटीं रहावयाची आणि शेवटीं भुकेनें मरावयाची वेळ येईल, व मानव- जातीवरील हें भयंकर संकट टाळण्यासाठी प्रजाजननाचे प्रमाण कमी करणें हेंच सर्व स्त्री-पुरुषांचें कर्तव्य आहे.
 मानवी जातीवरील या आपत्तीचा इशारा स्पष्टपणे देण्याचे काम प्रथम मालथस यानें केलें. सन १७९८ च्या सुमारास त्यानें 'लोक- संख्येविषयीं' ( Essay on population ) या नांवाचा जो ग्रंथ प्रसिद्ध केला त्यांत त्यानें लोकसंख्येची वाढ कोणत्या तत्त्वानु- सार होत असते आणि त्या वाढीचे मनुष्यजातीच्या हिताहितावर कोणकोणते परिणाम होण्यासारखे असतात, या प्रश्नांचा अगदीं नवीन दृष्टीने विचार केला, आणि या विचाराच्या आधारावर त्यानें जो एक मध्यवर्ति सिद्धान्त प्रतिपादिला त्यांतील नाविन्यामुळे आणि संकटसूचनेमुळे तर सारे लोक थक्कच होऊन गेले. मालथसनें असें प्रतिपादिलें कीं, 'लोकसंख्येची वाढ नेहमीं भूमितिश्रेढीनें होत असते. आणि देशाची उत्पादक शक्ति गणितश्रेढीने वाढत असते. म्हणजे कोण- त्याही देशाची लोकसंख्या दोनशेंची चार हजार, चार हजाराची एक अब्ज साठ कोटि अशी वाढत जाते आणि तेवढ्याच काळांत देशांत उत्पन्न होणारी धान्य वगैरे उपजीविकेची द्रव्यें मात्र दोनशेचीं चाररों, त्याची आठशे अशी वाढत जातात. हेंच निराळ्या शब्दांनी