पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'थर्ड' लाइनमधील औषधं इंटीग्रेज इन्हिबिटर (II) रालटेनाविर RGV) फ्युझिन इन्हिबिटर (FI) माराविरॉक (MVC)) पीआय (PD). दारुनाविर (IDRV) R. काल रात्रीपासून झोप नव्हती. आजचा दिवस कधी उगवतोय असं झालं होतं. अठरा संपून आज बारक्याला एकोणिसावं लागणार होतं. वाटलं होतं, सर्वांना बोलावून वाढदिवस साजरा करावा. पण मनात भीती 'नको, कोणाची तरी नजर झागायची.' मग परत वाटलं सगळ्यांना बोलावून करू थाटामाटात. पुढचं कोणी पाहिलंय. बारक्याची मात्र थाटामाटात वाढदिवस साजरा करायची इच्छा नव्हती. त्याला मित्रांबरोबर लोणावळ्याला जायचं होतं. सकाळी उठून ताईंनी शिरा केला. त्याचं औक्षण केलं. ३०० रु. त्याच्या हाती दिले. तो पाया पडला. "चांगली नोकरी लागू देत." म्हणेसतोवर, त्याला शुभेच्छांचे फोन येणं सुरू झालं. मग आरशासमोर उभं राहून बारक्यानी केसांना जेली लावली. केस उभे-आडवे बसवून निघाला. ताई म्हणाल्या, पिऊबिऊ नकोस तिथे, नीट रहा." एक नाही की दोन नाही. बारक्या नक्की पिणार, ताईंच्या मनात विचार आला. आता बारक्या म्हणणं बंद केलं पाहिजे. पोरगा प्रौढ झालाय. 'अक्षय'. त्याच्या बापानी त्याचं नाव ठेवलं होतं. आज त्याचा बाप 38