पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"

गोळ्या नाही घेतल्या तर काय होणार आहे?" तो म्हणाला. आता त्याला काय सांगणार? "नाही बाबा, त्या रोजच्या रोजच घ्यायच्या असतात." बारक्या म्हणाला, "मग आता?" दोघंजण थोडा वेळ शांत बसले. मग बारक्या म्हणाला, "डॉक्टरांचा नंबर आहे काय तुझ्याजवळ?"

"नाही ना... पण निमीकडे हॉस्पिटलचा नंबर आहे.' बारक्याने निमीला फोन केला, तिच्याकडून हॉस्पिटलचा लॅन्डलाइन नंबर मिळवला. हॉस्पिटलचा फोन लागायला खूप वेळ लागला. सारखा एंगेज्ड, मग लागला एकदाचा. ताई काउन्सिलरशी बोलल्या. काउन्सिलरनी डॉक्टरांना फोन दिला. डॉक्टर म्हणाल्या, "कोणत्या गावी आहात तुम्ही?.... किती दिवस राहणार आहात?.... ठीक आहे. बहुतेक तिथे ही औषधं मिळतील. मी औषधांची नावं एसएमएस करते. तुमचा नंबर दया. जवळच्या मेडिकलच्या दुकानात विचारा. त्याला माझा एसएमएस दाखवा. नाही म्हणाला, तर मी केमिस्टशी बोलून घेईन." मग एसएमएस आला. दोन दुकानं औषधं मिळाली नाहीत. शेवटी एकदाची औषधं मिळाली. रणरणत्या उन्हात फिरता फिरता दोघं थकून गेली. मग देवीला गेले. जेवून विसावले. घरी आल्यावर, काउन्सिलर व डॉक्टरांना धन्यवाद देण्यासाठी ताई हॉस्पिटलात गेल्या. काउन्सिलरनी व डॉक्टरांनी एसएमएसची आयडिया लढवल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. ताई म्हणाल्या, "ती माझ्या पोराची आयडिया, मला तर काही सुचतच नव्हतं." काउन्सिलर म्हणाल्या, "ही आयडिया दरवेळी चालेलच असं नाही. म्हणून या असल्या आयडियाची सवय लागू देऊ नका. लक्षात ठेवा, की सेकंड लाइन औषधं घेणं चुकवलं तर मात्र आपल्याला काही करता येणार नाही. कारण तिसऱ्या लाइनची औषधं सर्वसामान्यांना परवडणारी नाहीत. महिन्याला २०, ००० ते ३०, ००० रुपये खर्च येतो. ती सरकारी दवाखान्यात उपलब्ध नाहीत. तेव्हा याचं गांभीर्य लक्षात असू देत." 37 onames