पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असता तर?.... थोडावेळ शून्यात बघत आठवणीत बुडाल्या. आपल्या ताटात हात घातला म्हणून अक्षयच्या थोबाडात मारलेलं आठवलं. क्षयरोगाचा खोकला आठवला. गावाकडे वहिनीनी दिलेली वागणूक आठवली. सम्याचं जाणं आठवलं. अक्षयचा अपघात आठवला. त्याचा १०वी पास व्हायचा दिवस आठवला. डोळ्यांत पाणी आलं. पदराने पाणी पुसून ताई स्वयंपाकघरात गेल्या. आता अक्षय मोठा झालाय. त्याला सत्य सांगितलं पाहिजे. निमी कधीपासून म्हणत होती, "सांगा त्याला. चांगलं, वाईट आपल्या माणसापाशी नाही सांगायचं तर कोणापाशी?" पण शेजारीण म्हणाली होती, "नका सांगू, तो तुम्हाला सोडून जाईल" ताईंना मात्र वाटत होतं, की त्याला सांगावं. भीती होती तो काय म्हणेल, त्याला काय वाटेल. पण मन सांगत होतं, की त्याला त्रास होईल पण तो सावरेल. आपल्याला स्वीकारेल. पण आज नाही सांगायचं. उद्या संध्याकाळी तो घरी आला, की विषय काढू. ताई निर्धाराने उठल्या, स्वयंपाकघरात गेल्या आणि निमीला देण्यासाठी डब्यात शिरा भरू लागल्या.

39...