पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केली. आकडा ६००पर्यंत वाढला होता. गोळ्या काम करत होत्या. डोळे थोडे पिवळे दिसत होते. सुरुवातीला फारसं काही वाटलं नाही, पण नंतर हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागलं. शेजारची म्हणाली, "का हो कावीळ झाली का?" मेलीचं भारी लक्ष. हळूहळू सगळेजण ताईंच्या डोळ्यांकडे बघू लागले. काउन्सिलरला विचारलं तर ती म्हणाली, "गॉगल वापरा," ताई म्हणाल्या, "गॉगल वापरायला मी काय नटी आहे का?" काउन्सिलर म्हणाली, "मग आता दुसरा काय उपाय सांगू?" ताई म्हणाल्या, "डोळे पांढरे करायचं औषध दया की." काउन्सिलर म्हणाली, "असं कोणतं औषध नाही ताई. असतं तर दिलं नसतं का?" पूर्वी दररोज आरशासमोर उभं राहून पांढरे केस दिसतात का हे पाहात बसायची सवय होती. आता दररोज उठून आरशात डोळे न्याहाळायची सवय लागली. 'कावीळ झाली आहे.' असं सांगावं तर, हे औषध घ्या, ते औषध घ्या, म्हणून गावभरचे नको असलेले सल्ले ऐकावे लागणार! 'कावीळ नाही' म्हणून सांगावं तर डोळे पिवळे दिसत होते. ताईंनी ठरवलं. 'कावीळ नाही आहे म्हणून बिनदिक्कत सांगायचं. काय म्हणतील, बाई धडधडीत खोटं बोलती. म्हणू देत. कोणाकोणाची जीभ कुठे कुठे आवरायची. वर्षभर कुठे जाणं झालं नव्हतं म्हणून बारक्याला घेऊन ताई श्रीवर्धनला गेल्या. त्याला श्रीवर्धनचं बुकिंग करायला सांगितलं. गाडीला ही गर्दी होती. गाडी श्रीवर्धनला पोहोचली आणि लक्षात आलं, की बॅग बांधायच्या गडबडीत गोळ्या घरी विसरल्या. बटव्यात तर दोनच डोस होते. ताई एस. टी. स्टॅन्डवर कपाळाला हात लावून बसल्या. बारक्या म्हणाला, "काय झालं गं?" बारक्याला सांगितलं. "दोन दिवस 361