पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आता या गोळ्यांचे काय दुष्परिणाम होणार हा विचार करूनच मंगलताईंना खचल्यासारखं झालं. त्यात बारक्याची दहावीची परीक्षा. वाटलं होतं डॉक्टरांना सांगावं अजून एक महिना थांबा. बारक्याची परीक्षा झाली, की मग औषधं बदला. पण मग वाटलं जिवाशी असं नको खेळायला.

. 'व्हायरल लोड'ची चाचणी केली. मूत्रपिंड कसं काम करतंय याची 'सेरम क्रियेटिनीन'ची चाचणी केली. रक्ताच्या काही चाचण्या केल्या. रिपोर्ट चांगले आले. पोराची परीक्षा आणि नव्या गोळ्या सुरू व्हायची एकच वेळ. नवीन गोळ्या सुरू झाल्या. ताईंना 'टेनोफोविर + लॅमिव्हुडिन बुस्टेड ॲटाझानाविर' गोळ्या दिल्या गेल्या. त्या नियमतपणे घेणं ताईंनी सुरू केलं. + त्याला "५७% मिळाले" आत येत येत बारक्या म्हणाला. "सुटले बाई एकदाची, मार्कलिस्ट बघू." बाकी विषयात मार्क चांगले होते पण गणित, इंग्रजीमध्ये जेमतेम पास झाला होता. जाऊ देत. पास झाला ना. ताईंनी देवाला हात जोडले. बारक्याला पैसे दिले. "पेढे आण आणि निमी, मास्तर, शेजारणीला दे." ताईंनी भावाला फोन केला, सांगितलं. मास्तरांच्या सांगण्याप्रमाणे बारक्याला आयटीआयला घातलं. काही पैसे निमीकडून उसने घेतले व काही पैसे बारक्याच्या वर्कशॉपच्या कामातून साठवलेले, फी म्हणून भरले. आयटीआय सुरू झाल्यापासून बारक्या तर फक्त झोपायला घरी असल्यासारखा झाला. सकाळी जो जायचा तो रात्री उशिरा घरी यायचा. सेकंड लाइन औषधं सुरू झाल्यावर ६ महिन्यांनी सीडी-फोर चाचणी 35