पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांगायचं या बाईला? तिला काय कळतंय. डॉक्टर म्हणाल्या, "असं करा. सीडी-फोर मागच्या महिन्यात केलाय तो चांगलाय. अजून ५ महिन्यांनी सीडी-फोरच्या चाचणीला या. मग बघू." ताई म्हणाल्या, "मग आता या गोळ्या चालू ठेवू का?", "हो हो, या गोळ्या चालू ठेवा, पण आता एकही गोळी चुकवू नका." ताई म्हणाल्या "नाही आता नक्की नाही चुकवणार." दडपण आलं. जे व्हायला नको होतं, ते झालं. गोळ्या चुकल्या. गोळ्या घेणं परत नियमानं चालू केलं पण व्हायचं ते झालंच. दिवाळीच्या वेळी हळूहळू ताप येऊ लागला. जिना चढताना धाप लागू लागली. श्वास घेताना त्रास होऊ लागला. ताई लगेच दवाखान्यात गेल्या. न्यूमोनिया झाला होता. गोळ्या सुरू केल्या. कामाला आठवड्याचा खाडा झाला. मग परत कामाला लागल्या. बसून कोणाचं झालंय? पुढच्या आठवड्यात डॉक्टरांनी भेटायला बोलावलं. डॉक्टर मॅडम म्हणाल्या, "ज्याअर्थी परत संधिसाधू आजार झालाय त्याअर्थी एआरटी औषधं निष्क्रिय झाली असावीत. सीडी-फोर करू आणि बघू.' सीडी-फोरची चाचणी केली. मागचा ताईंचा सीडी-फोर होता ७५०, आता तो घटून ३५०वर आला होता. डॉक्टर म्हणाल्या, "याचा अर्थ ही औषधं आता तुम्हाला लागू होत नाहीयेत. तुम्ही गोळ्या चुकवल्यामुळे ती निकामी झाली आहेत. आता आपल्याला सेकंड लाइनची औषधं सुरू करावी लागणार. या तरी गोळ्या नियमित घ्या. कळलं का?" डॉक्टर मॅडमचा आवाज चढला होता. मंगलताईंनी निमूटपणे सर्व ऐकून घेतलं. चूक आपलीच होती. काय सांगणार? परत चाचण्या, परत नव्या गोळ्या, परत त्याचे नवे दुष्परिणाम. 27 34 URMIRE