पान:संजीवनी (अँटिरेट्रोव्हायरल थेरपी )(Marathi).pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नुसती दारू दिवस- -रात्र. काही खात नव्हता. दोन आठवडे दवाखान्यात होता. आज गेला." शेजारीण बराच वेळ हळूहळू आवाजात बोलत राहिली. ताई ऐकल्यासारखं करत होत्या, पण लक्ष नव्हतं. मन सुन्न झालं होतं. शेजारीण जेव्हा दुसऱ्यांदा म्हणाली, "येताय ना, जाऊन येऊयात." तेव्हा ताई उठल्या. ताईंना अजिबात जायची इच्छा नव्हती, पण इलाज नव्हता.

ताईंना रात्री फणफणून ताप आला. दुसऱ्या दिवशी बारक्यानी डॉक्टरांना सांगून औषध आणलं. ताईंनी दिवसभर काही खाल्लं नाही. सम्याने जरा स्वत: ची जबाबदारी घेतली असती तर? औषधं घ्यायची, स्वत: ची काळजी घ्यायची. पण नाही, जबाबदारी घ्यायची वेळ आली, की पुरुषजात पेकलीच समजायची. ३५ काय वय आहे का जायचं? स्वत: च्या हातानी स्वत: चं वाटोळं केलं.

आपल्याला त्याने आजार दिला, पण त्याच्याबरोबर दोन दिवस चांगलेही गेले, हे त्या विसरू शकत नव्हत्या. नवरा गेल्यावर दोन वर्षानंतर त्याच्याशी पहिल्यांदा संग झाला होता. त्याच्या स्पर्शामुळं शरीर वखवखलेलं राहिलं नाही. तो ताईंशी बहुतांशी वेळा चांगला वागला. गरजेच्या वेळी अधूनमधून पैसे पुरवले. त्याला घट्ट कवटाळून बसण्याचं सुख आठवलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. नैराश्येच्या गर्तेत दिवस गेला. रात्री ताप ओसरला. पहाटे अचानक लक्षात आलं, की परवा रात्रीची, कालच्या सकाळची व संध्याकाळची अशा तीन गोळ्या चुकल्या. अरे देवा, आता काय होणार याची चिंता पडली.

सकाळी उठून लगेच दवाखान्यात गेल्या. डॉक्टरांना भेटल्या. सांगितलं. डॉक्टर मॅडम नाराज झाल्या. म्हणाल्या, "बजावून सांगितलं होतं ना, मग का असं केलंत?" ताईंच्या मनात आलं, आता काय 311